चेन्नई: मै पल दो पल का शायर हूँ... अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेल्या 'कभी-कभी' या चित्रपटातील साहिर लुधियानवी यांनी लिहलेले आणि मुकेश यांनी गायलेले या गाण्यासह भारताचा माजी कर्णधार याने २००४ ते २०१९ पर्यंतचे सर्व क्षण एका व्हिडित टाकले आणि निवृत्ती जाहीर केली. वाचा- धोनीच्या मैदानावरील निर्णयांप्रमाणेच निवृत्तीचा निर्णय देखील कोणाला कळाली नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेताना धोनीने हे देखील स्पष्ट केले की तो युवा खेळाडूंच्या मार्गात अडथळा ठरणार नाही. जर धोनीने निवृत्ती घेतली नसती तर ऋषभ पंत, संजू सॅमसन आणि इशान किशन सारख्या युवा खेळाडूंवर आयपीएलमध्ये अधिक चांगली करण्याचा दबाव वाढला असता. वाचा- या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये वर्ल्ड कप होणार होता. यासाठी तयारी देखील करत होता. पण करोना व्हायरसमुळे वर्ल्ड कप पुढे ढकरण्यात आला. त्यामुळे हे निश्चित झाले की संघात विकेटकिपर म्हणून पंतला सर्वात आधी संधी मिळाली असती. वाचा- निवृत्ती जाहीर करण्याआधी धोनी या व्यक्तीला भेटला धोनी आणि चेन्नई सुपर किंग्जचे मालक यांचे जवळचे नाते आहे. २०१९ साली न्यूझीलंडविरुद्ध सेमीफानल मॅचमध्ये पराभव झाल्यानंतर धोनीने एकही सामना खेळला नाही. तेव्हापासून धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरू होती. रांचीहून शुक्रवारी चेन्नईत दाखल झाला. चेन्नई संघातील सहकाऱ्यांची भेट झाल्यानंतर धोनीने श्रीनिवासन यांची भेट घेतली आणि शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/33ZuESS
No comments:
Post a Comment