मुंबई: २०११ साली आजच्या दिवशीच २ एप्रिल रोजी भारतीय क्रिकेट संघाने २८ वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता. भारताने वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेचा पराभव करत दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकला होता. क्रिकेट वर्ल्ड कपच्या इतिहासात प्रथमच एखाद्या संघाने घरच्या मैदानावर चषक उंचावला होता. अंतिम सामन्यात भारतीय संघाच्या विजयाचे शिल्पकार ठरेल झहीर खान, गौतम गंभीर आणि होय. झहीरने गोलंदाजीत तर धोनी आणि गंभीरने फलंदाजीत शानदार कामगिरी करत भारतीय संघाला विजेतेपद मिळवून दिले होते. संपूर्ण मालिकेत युवराज सिंग भारताचा हिरो ठरला. भारताचा विद्यमान कर्णधार विराट कोहली याने या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय वनडेमधील पहिले शतक झळकावले होते. अंतिम सामन्यातील धोनीचा तो षटकार कोणताही भारतीय चाहता विसरणार नाही. भारताला विजयासाठी ११ चेंडूत ४ धावांची गरज होती आणि धोनीने षटकार मारत वर्ल्ड कप जिंकून दिला होता. असा झाला होता सामना वर्ल्ड कप २०११च्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत २७४ धावा केल्या होत्या. लंकेकडून महेला जयवर्धनेने १०३ धावांची खेळी केली. भारताची सुरुवात फार चांगली झाली नाही. विरेंद्र सेहवाग आणि लवकर बाद झाले. भारताची अवस्था २ बाद ३१ अशी होती. तेव्हा गंभीर आणि विराट कोहली यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८३ धावांची भागिदारी केली. विराट २२व्या षटकात बाद झाला. त्यानंतर युवराज सिंगच्या ऐवजी मैदानात आला भारताचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी. त्याने गंभीरसह १०९ धावांची भागिदारी केली. गंभीर ९७ धावांवर बाद झाला. त्यानंतर धोनीने युवराजसह नाबाद ५४ धावांची भागिदारी केली आणि संघाला विजेतेपद मिळवून दिले. युवराजने २४ चेंडूत २१ तर धोनीनी ७९ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांसह ९१ धावा केल्या. भारतीय क्रिकेट संघाने २८ वर्षानंतर वनडे वर्ल्ड कपचे विजेतेपद मिळवले आणि सचिन तेंडुलकरचे वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न पूर्ण झाले. या विजयानंतर संघातील खेळाडूंनी सचिनला खांद्यावर उचलून मैदानाची फेरी मारली. काही दिवसांपूर्वी सचिनच्या या फोटोला क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्तम क्षणाचा पुरस्कार मिळाला होता.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2X2ckVu
No comments:
Post a Comment