मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज ४७ वा वाढदिवस आहे. करोनामुळे सचिनने यावेळी वाढदिवस साजरा न करण्याचे ठरवले आहे. या निर्णामुळे सचिनने पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकली. आज करोनामुळे सर्वजण घरात थांबले आहेत आणि सोशल मीडियावरून त्याला शुभेच्छा देत आहेत. क्रिकेट मैदानावर दोन दशक अधिराज्य गाजवणाऱ्या सचिनने अशी कामगिरी केली आहे की ज्याच्या जवळपास देखील कोणाला पोहोचता आला नाही. भारतीय संघातील असे अनेक खेळाडू आहे जे सचिनला फलंदाजी करताना पाहून मोठे झाले. सचिनने केलेले विक्रम हे या खेळाडूंसाठी एक मैलाचा दगडच वाटतात. पाहा- भारतरत्न या सर्वोच्च सन्मानाने गौरवण्यात आलेल्या सचिचा जन्म २४ एप्रिल १९७३ रोजी मुंबईत झाला. निवृत्तीनंतर सचिन राज्यसभेचा सदस्य देखील होता. भारतीय हवाई दलाने त्याला ग्रुप कॅप्टन ही मानद पदवी दिली आहे. तर आयसीसीने त्याला हॉल ऑफ फेम पुरस्कार दिला. नजर टाकूयात सचिनच्या एका विक्रमावर... वाचा- >> आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा >> आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडू खेळणारा खेळाडू >> सर्वाधिक शतक करण्याचा विक्रम >> सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रम >> आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा ९० हून अधिक धावा >> सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा खेळाडू >> आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार >> सर्वाधिक वेळा मालिकावीर पुरस्कार जिंकणारा खेळाडू >> आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार >> वनडे क्रिकेटमधील पहिले द्विशतक >> आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक >> कसोटी क्रिकेटमध्ये ५० हून अधिक शतक >> सर्वाधिक २०० कसोटी खेळणारा खेळाडू वाचा- सचिनने वनडे आणि कसोटमध्ये पाकिस्तानविरुद्ध पदार्पण केले होते. पाकविरुद्धच्या पहिल्या सामन्यात सचिनने मधळ्याफळीत फलंदाजी केली होती. या सामन्यात त्याने १५ धावा केल्या. १९८९ मध्ये सचिनने सुरु केलाला हा प्रवास २०१३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध थांबला. करिअरच्या अखेरच्या कसोटीत सचिनने अर्धशतकी खेळी केली होती. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय वनडे करिअरची सुरुवात पाक विरुद्ध करणाऱ्या सचिनने अखेरची वनडे २०१२ मध्ये पाक विरुद्धच खेळली होती. त्या सामन्यात त्याने ५२ धावा केलेया होत्या. ते सचिनचे ९६वे अर्धशतक होते.जो एक विक्रम आहे. सचिनने भारतीय संघाकडून फक्त एकच टी-२० सामना खेळला आहे. २००६ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हा सामना झाला होता. त्यानंतर सचिन आयपीएलमध्ये खेळला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Ku5lgT
No comments:
Post a Comment