मुंबई: मास्टर ब्लास्टर आज त्याचा ४७वा वाढदिवस साजरा करत आहे. या वर्षी सचिनने करोना व्हायरसमुळे वाढदिवस साजरा न करण्याचे ठरवले आहे. असे असले तरी बीसीसीआय,आयसीसीपासून ते आजी-माजी क्रिकेटपूट आणि सचिनचे जगभरातील कोट्यवधी चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला शुभेच्छा देत आहेत. पाहा- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा, वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा, कसोटीत सर्वाधिक धावा, सर्वाधिक १०० शतक असे अनेक विक्रम नोंदवलेल्या सचिनने कसोटीत १५ नोव्हेंबर १९८९ रोजी पाकिस्तानविरुद्ध पदार्पण केले होते. त्यानंतर १८ डिसेंबर १९८९ रोजी पाकविरुद्धच पहिला आंतरराष्ट्रीय वनडे सामना खेळला होता. वाचा- सचिनच्या या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला त्याचा १९८९ मधील एका मुलाखतीचा खास व्हिडिओ दाखवणार आहोत. या व्हिडिओत १८ वर्षाचा सचिन मुलाखत देत आहे. व्हिडिओत मुलाखतकर पहिलाच प्रश्न त्याला विचारतात की तु मुलाखती देऊन कंटाळला आहेस का? त्यानंतर सचिन क्रिकेट आणि त्याच्या फलंदाजीबद्दल सांगतो. वाचा- पाहा सचिनचा दुर्मिळ व्हिडिओ...
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3cJS1Rv
No comments:
Post a Comment