मुंबई: भारतीय संघाने त्यांचा अखेरचा परदेशी दौरा न्यूझीलंडला केला होता. जो मार्च महिन्याच्या सुरुवातीला संपला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका भारतात होणार होती. पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर अन्य दोन सामने करोना व्हायरसमुळे रद्द करण्यात आली. त्यानंतर दोन्ही संघांच्या क्रिकेट बोर्डानी परिस्थिती सामान्य झाल्यानंतर ही मालिका पूर्ण खेळवणार असल्याचे म्हटले होते. आता क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी पुढे आली आहे. वाचा- ऑगस्ट महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाऊ शकतो. या दोन्ही संघांच्या दरम्यान ३ सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाऊ शकते. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय संघाच्या आफ्रिका दौऱ्याची शक्यता अधिक आहे. अर्थात यासाठी पहिली अट करोना व्हायरसची परिस्थिती नियंत्रणात असने ही होय. आफ्रिका दौऱ्यात कदाचीत ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेचा विचार केला जाऊ शकतो. कारण त्याच काळात भारताचा झिम्बाब्वे दौरा आहे. भारत झिम्बाब्वेविरुद्ध ३ सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. वाचा- आफ्रिका दौऱ्यासाठी बीसीसीआयने तांत्रिकदृष्ट्या परवानगी दिली आहे. पण या दौऱ्याआधी बऱ्याच गोष्टी घडायच्या आहेत. यावर दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्ड आणि आयसीसीचे मत काय आहे हे पाहावे लागले. बीसीसीआयचा उद्देश आफ्रिका बोर्डाचे होणारे नुकसान कमी करण्याचा आहे. वाचा- या दौऱ्याबद्दल चर्चा आहे. पण अधिकृतपण कोणी बोलण्यास तयार नाही. आफ्रिका बोर्डाच्या मीडिया सेलने याची माहिती दिली आहे. दोन्ही बोर्डामध्ये चर्चा आहे आणि त्यावर लवकर निर्णय होईल, असे एका प्रवक्त्याने सांगितले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Y1GV66
No comments:
Post a Comment