नवी दिल्ली: करोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन आहे. कोट्यवधी लोक सक्तीने घरी थांबले आहेत. चीनमधून जगभर पसरलेल्या करोना व्हायरसमुळे सर्व जण हैराण झाले आहेत. क्रीडा क्षेत्रातील सर्व खेळाडू घरी थांबले आहे. अनेक खेळाडू सोशल मीडियाच्या माध्यमातून लाइव्ह चॅट करत आहेत. अशाच एका चॅटमध्ये भारताच्या क्रिकेटपटूने चीनने सर्वांना घरी बसवले अशी बोलकी प्रतिक्रिया दिली आहे. वाचा- भारतीय संघाचा सलामीवीर आणि हिटमॅन अशी चाहत्यांमध्ये ओळख असलेला रोहित शर्माने गुरुवारी माजी क्रिकेटपटू सोबत इस्टाग्रामवर लाइव्ह चॅट केले. या चॅट दरम्यान रोहित गंमतीने म्हणाला, ये चीन ने क्या कर दिया... घर बैठा दिया है यार. वाचा- करोना व्हायरसमुळे बीसीसीआयला आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करावी लागली. जर करोना नसता तर आज २४ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना चेन्नईच्या चेपक स्टेडियमवर झाला असता. या चॅट दरम्यान हरभजनने सांगितले की या सामन्यासाठी सचिन स्वत: येणार होता. आम्ही तेथेच सचिनचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले होते. यावर म्हणाला, हा ना यार... काय करू शकतो आपण. या चीनने तर सर्वांना घरी थांबायला लावले. रोहितच्या उत्तरावर हरभजन म्हणाला, बाहेर भाजी घेण्यास जाण्यासाठी देखील भीती वाटत आहे. वाटते की भाजीमुळे करोना होईल. आयपीएलचा १३वा हंगाम २९ मार्चपासून सुरू होणार होता. पण करोना व्हायरसमुळे बीसीसीआयने प्रथम ही स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत आमि त्यानंतर अनिश्चित काळासाठी स्थगित केली. फक्त आयपीएलच नाही तर अन्य क्रीडा स्पर्धा देखील स्थगित करण्यात आल्या आहेत. आता भविष्यातील क्रीडा स्पर्धेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आयसीसी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचा देखील समावेश आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/357TyOD
No comments:
Post a Comment