नवी दिल्ली: जगातील सर्वात दिग्गज ओपनर म्हणून भारताचा हिटमॅन रोहित शर्माचे नाव घेतले जाते. भारताकडून खेळताना रोहितने आतापर्यंत अनेक शानदार खेळी केल्या आहेत. पण असे असले तरी रोहितचे एक स्वप्न अद्याप पूर्ण झालेले नाही. यासाठी रोहित आता सर्व लक्ष त्या एका स्वप्नपूर्तीसाठी केंद्रीत केले आहे. वाचा- वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा द्विशतक करणारा तसेच तिनही प्रकारात शतक रोहितला भारतासाठी वर्ल्ड कप जिंकायचा आहे. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २००७चा टी-२० वर्ल्ड कप जिंकला होता. २०११च्या वर्ल्ड कप संघात रोहित नव्हता त्यामुळे आता वनडे वर्ल्ड कप जिंकायचा आहे. वाचा- एका इंग्रजी वेबसाईटशी बोलताना रोहित म्हणाला, वर्ल्ड कप जिंकणे एक स्वप्न आहे. तो मला जिंकायचा आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही सामना खेळायला जाता तेव्हा तो तुम्हाला जिंकायचा असतो. पण वर्ल्ड कप जे सर्वोच्च आहे आणि त्यासाठी तो मला जिंकायचा आहे. वाचा- रोहितने २०१९च्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा केल्या होत्या. इंग्लंडमध्ये झालेल्या या स्पर्धेत रोहितने ५ शतकांसह ६४८ धावा केल्या होत्या. पण सेमीफायनल सामन्यात आणि अन्य आघाडीचे फलंदाज अपयशी ठरल्यामुळे भारताचा न्यूझीलंडकडून पराभव झाला. या सामन्यातील पराभवानंतर रोहित रडला होता. वाचा- सचिननंतर वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतकं करण्याचा विक्रम रोहितच्या नावावर आहे. फक्त दोन वर्ल्ड कप खेळणाऱ्या रोहितने ६ शतकं केली आहेत. तर सचिनच्या नावावर ६ स्पर्धेत ६ शतकांची नोंद आहे. यामुळेच आता रोहितने २०२३ साली भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपवर लक्ष्य केंद्रीत केले आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2VtN1dN
No comments:
Post a Comment