नवी दिल्ली: भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार रोहित शर्माने माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीबद्दल एक अजब वक्तव्य केले आहे. करोना व्हायरसमुळे सर्व क्रिकेटपटू घरी थांबले आहेत आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आहेत. भारताचा माजी फिरकीटपटू हरभजन सिंगसोबत इंस्टाग्राम चॅटवर बोलताना रोहितने धोनीबद्दल एक अजब वक्तव्य केले. वाचा- धोनीने गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेत भारताकडून अखेरचा सामना खेळला होता. त्यानंतर क्रिकेटपासून दूर झालेल्या धोनीने आयपीएलच्या माध्यमातून भारतीय संघात परत यायचे होते. पण करोनामुळे आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित केली आहे. त्यामुळे धोनीचे भारतीय संघातील प्रवेश होईल की नाही याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. वाचा- हरभजनशी बोलताना रोहित म्हणाला, मला माहिती नाही त्याच्या सोबत काय होत आहे. त्याची कोणतीही बातमी ऐकली नाही. जुलैमध्ये त्याने अखेरचा सामना खेळला होता. त्यानंतर आतापर्यंत त्याच्याबद्दल मला काहीच माहिती नाही. जर कोणाला धोनीबद्दल माहिती हवी असेल तर त्याने स्वत:हून त्याच्याशी संपर्क करायला हवा. वाचा- जेव्हा धोनी क्रिकेट खेळत नाही तेव्हा त्याच्याशी संपर्क करने प्रचंड अवघड असते. तो भूमिगत होतो. धोनीबद्दल काही जाणून घ्यायचे असेल तर थेट त्याच्याकडे जावे. तुम्हा सर्वांना माहितच आहे की तो रांचीत राहतो, असे रोहित म्हणाला. अर्थात तुम्ही आता त्याच्याकडे जाऊ शकत नाही. पण लॉकडाऊन झाल्यानंतर बाईक किंवा विमानाने त्याच्यापर्यंत पोहोचू शकता आणि विचारू शकता की, तुझा प्लॉन काय आहे? तु क्रिकेट खेळणार आहेस की नाही?, असे रोहितने चॅट दरम्यान सांगितले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/353cMVC
No comments:
Post a Comment