लंडन: करोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी अनेक खेळाडू मदत करत आहेत. जगभरातील क्रिकेटपटू देखील आर्थिक स्वरुपात मदत देत आहेत. भारतीय क्रिकेटपटूंमध्ये सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, विराट कोहली, रोहित शर्मा आदी क्रिकेटपटूंनी काही लाखांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारांना मदत केली आहे. करोनाविरुद्धच्या लढाईत एका क्रिकेटपटूने मोठा निर्णय घेतला आहे. वाचा- इंग्लंडचा क्रिकेटपटू आणि फलंदाज जोस बटलरने करोना विरुद्धच्या लढाईसाठी निधी गोळा करण्याचा निर्णय घेतला आहे. करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्यांना रुग्णालयांना मदत करण्यासाठी बटलरने २०१९च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये घातलेली जर्सीचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. या जर्सीच्या लिलावातून मिळणारे पैसे करोनाग्रस्तांच्या उपचारासाठी वापरले जाणार आहेत. यासाठी बटलरने तातडीने लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. वाचा- ईबे वेबसाइटवर बटलरने त्याची वर्ल्ड कप फायनलमधील जर्सी लिलावासाठी ठेवली आहे. एक एप्रिल रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ९ वाजेपर्यंत ५६ लोकांनी या जर्सीवर बोली लावली होती. आतापर्यंत या जर्सीला ५६ लाख रुपयांची सर्वाधिक बोली लावली आहे. जर्सीवर पुढील ६ दिवस बोली लावली जाणार आहे. त्यानंतर या लिलावातून किती पैसे मिळतील हे कळणार आहे. गेल्या वर्षी १४ जुलै रोजी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड कप फायनल झाली होती. दोन्ही संघांनी ५० षटकात समान धावा केल्याने सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. सुपर ओव्हरमध्ये देखील सामना टाय झाल्यावर सर्वाधिक चौकार मारणाऱ्या इंग्लंड संघाला विजेतेपद देण्यात आले होते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/33ZJu9S
No comments:
Post a Comment