चंडीगड: सूरतमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मंगळवारी भारताचा ५१ धावांनी झालेल्या विजयात महत्त्वाचे योगदान देणारी रोहतकची शेफाली वर्मा हिला आपल्या क्रिकेटचे प्रशिक्षण मुलाच्या रुपात घ्यावे लागले होते. याचे कारण म्हणजे चंडीगडमध्ये मुलींना प्रशिक्षण देण्यासाठी कोणतीही व्यवस्था नव्हती हे. भारतीय महिला क्रिकेट संघात सर्वात कमी वयात टी-२० आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण करणारी या १५ वर्षीय फलंदाज मुलीने क्रिकेटसाठी आपले महत्त्वाकांक्षी वडील संजीव शर्मा यांच्या सूचनेवरून आपले केस कापून टाकले होते. हरयाणाच्या रोहतक जिल्ह्यातील सर्वच क्रिकेट अकादमींनी तिला प्रवेश देण्यास नकार दिला होता हेच त्या मागचे कारण होते. माझ्या मुलीला कुणीच प्रवेश देण्यासाठी तयार होत नव्हते, कारण राहतकमध्ये मुलींसाठी एक देखील अकादमी नव्हती. मी या अकादमींकडे अक्षरश: मुलीला प्रवेश देण्यासाठी भीक मागितली. मात्र, माझे कुणीही ऐकले नाही, असे शेफालीचे वडील संजीव शर्मा यांनी सांगितले. त्यांनी अनेक क्रिकेट अकादमींचे दार ठोठावले. मात्र सगळीकडूनच नकार येत गेला. त्यानंतर शेवटी त्यांनी आपल्या मुलीचे केस कापण्याचा निर्णय घेतला आणि ते शेफालीला अकादमीत घेऊन गेले. त्यानंतर तिला प्रवेश मिळाला. मात्र, केस कापले असले तरी ही मुलगी आहे हे कुणाच्याच लक्षात आले नाही का,असा प्रश्न शेफालीच्या वडिलांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, ' मी घाबरलो होतो. परंतु, कुणाच्या ते लक्षात आले नाही. शेफालीच्या वयात सर्व मुलं जवळजवळ सारखीच दिसतात.' मुलांच्या संघात खेळत असताना अनेकदा जखमी होणाऱ्या शेफालीचे क्रिकेटचे वेड वाढत चालले होते. मात्र जेव्हा तिने शाळेच्या मुलींची क्रिकेट टीम बनवण्याचा निर्णय घेतल्यानंतर परिस्थिती बदलली. मुलांविरुद्ध खेळणे अजिबात सोपे नव्हते. नेहमीच शेफालीच्या हेल्मेमध्ये जखमा होत असायच्या. काही वेळा चेंडू तिच्या हेल्मेटच्या ग्रीलला लागायचा. हे पाहिल्यावर मला भीती वाटायची. मात्र शेफालीने हार मानली नाही, असे शेफालीचे वडील संजीव शर्मा मोठ्या अभिमानाने सांगतात. जेव्हा मास्टर ब्लास्टर सचिन तेडुलकर आपला शेवटचा रणजी सामना खेळण्यासाठी हरयाणात आला होता, तेव्हा पासूनच शेफालीला क्रिकेटचे वेड लागले. तेव्हा शेफाली अवघ्या ९ वर्षांची होती. चौधरी बंसीलाल क्रिकेट स्टेडियममध्ये आपल्या वडिलांसोबत बसून ती सचिन, सचिन असे ओरडत होती. डेनियर वायट आणि मिताली राजने शेफालीचा खेळ पाहून तिला पुढची सुपस्टार म्हटले आहे. शेफालीने मंगळवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३३ चेंडूंमध्ये ४६ धावा केल्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2pzsBCZ
No comments:
Post a Comment