लाहोर: संघाचा कर्णधार याच्याविषयीच्या चर्चांना शुक्रवारी अखेर पूर्णविराम मिळाला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं कसोटी आणि टी-ट्वेंटी संघाच्या कर्णधारपदावरून त्याला हटवण्याचा निर्णय घेतला आहे. अझहर अलीची कसोटी क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी, तर बाबर आझमची टी-२० क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानंही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अनुभवी फलंदाज ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत पाकिस्तानचं नेतृत्व करणार आहे. तर नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या दौऱ्यात टी-२० संघाचं नेतृत्व करणार आहे, अशी माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं दिली आहे. सरफराज हा गेल्या दोन वर्षांपासून कसोटी, टी-२० आणि एकदिवसीय संघाचं नेतृत्व करत होता. त्याच्या नेतृत्वाखाली पाकिस्ताननं २०१७मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्याच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानच्या संघाची कसोटी आणि एकदिवसीयमध्ये जागतिक क्रमवारीतही घसरण झाली. श्रीलंकेविरुद्ध अलीकडेच झालेल्या टी-२० मालिकेतील सर्व सामन्यांत पाकिस्तानचा पराभवही झाला. कसोटी संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती झाल्यानंतर अझहर अलीनं माध्यमांना प्रतिक्रिया दिली. 'पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय संघाचा कर्णधार होणे हा माझ्यासाठी सन्मान आहे. मी खूपच भाग्यवान समजतो. टेस्ट चॅम्पियनशिपसाठी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो संघ सहकाऱ्यांच्या मदतीनं सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करीन,' असं तो म्हणाला. टी-२० संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती झाल्यानंतर बाबर आझमनंही प्रतिक्रिया दिली आहे. 'टी-२० मध्ये जगात क्रमांक एकवर असलेल्या संघाचा कर्णधार होणे हे माझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठं यश आहे. हे आव्हान पेलण्यासाठी मी सज्ज आहे. या कालावधीत मला खूप काही शिकायचं आहे. मी खूप आनंदीत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं माझ्यावर आणि माझ्या क्षमतेवर विश्वास दाखवला आहे, त्यामुळं मी खूश आहे,' असं आझम म्हणाला. सरफराजला हटवण्याची मिसबाहनं केली होती शिफारस पाकिस्तानचा मुख्य प्रशिक्षक मिसबाह उल हक हा सरफराजच्या खराब कामगिरीमुळे नाराज होता. सरफराजला कर्णधारपदावरून हटवण्यात यावे, अशी शिफारस त्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे सीईओ वसीम खान यांच्याकडे केली होती, असे वृत्त होते. सरफराज कर्णधारपदी राहू शकत नाही, असं मिसबाहनं बोर्डाला दिलेल्या अहवालात म्हटलं होतं. त्यानंतर त्याला कर्णधारपदावरून हटवलं जाऊ शकतं, अशी चर्चा होती.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/31mxOex
No comments:
Post a Comment