Ads

Friday, October 25, 2019

निर्भयपणे खेळणार; स्वतःला सिद्ध करेन: सॅमसन

कोची: चार वर्षांनंतर टीम इंडियात निवड झाल्यानंतर संजू सॅमसमनं निर्भयपणे खेळण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. माझ्यातील क्षमता बघून मी खेळ करतो. प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व मिळवण्यासाठी मी निर्भयपणे खेळ करण्याचा प्रयत्न करतो. या मोसमात मी सुरुवात केलीय. मला जेव्हा संधी मिळेल, मी स्वतःला झोकून देऊन सिद्ध करेन, असा विश्वासही त्यानं व्यक्त केला. चार वर्षांपूर्वी म्हणजेच २०१५ मध्ये संजू सॅमसनला टीम इंडियात संधी मिळाली होती. त्यावेळी सॅमसन झिम्बॉब्वेविरुद्ध एकमेव टी-२० सामना खेळला होता. हरारेमध्ये खेळल्या गेलेल्या या लढतीत सॅमसननं २४ चेंडूंत १९ धावा केल्या होत्या. त्यानंतर तब्बल चार वर्षे तो टीम इंडियात दुसऱ्यांदा संधी मिळेल या प्रतीक्षेत होता. अखेर बांगलादेश दौऱ्यासाठी त्याची संघात निवड झाली आहे. यंदाच्या मोसमात जबरदस्त फॉर्मात आहे. भारत अ आणि केरळकडून खेळताना तो खोऱ्यानं धावा वसूल करत आहे. विजय हजारे करंडकात त्याने २१२ धावांची विक्रमी खेळी करून प्रथम श्रेणीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. गोवा संघाविरुद्ध त्यानं ही तडाखेबंद खेळी केली होती. बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी निवड समितीनं संजूची निवड केली. यानंतर त्यानं 'टाइम्स ऑफ इंडिया'ला मुलाखत दिली. टीम इंडियात निवड झाल्यानं त्यानं आनंद व्यक्त केला. मी खूप खूश आणि उत्सुक आहे. जगात सर्वश्रेष्ठ असलेल्या भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी मी कठोर मेहनत घेत होतो. माझ्यावर जी जबाबदारी सोपवली जाईल ती मी आनंदाने पार पाडेन. मला कोणत्याही स्थानी खेळवण्याचा निर्णय घेतला तरी माझी तयारी आहे, असंही सॅमसनही म्हणाला. या मोसमात सर्वात मोठा आणि सकारात्मक बदल घडवून आणला आहे. माझ्या क्षमतेनुसार खेळण्याचा प्रयत्न केला आहे. प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व मिळवण्यासाठी निर्भयपणे खेळण्याचा माझा प्रयत्न असतो. या मोसमाची केवळ सुरुवात झाली आहे. कामगिरीत सातत्य ठेवण्याचा माझा प्रयत्न राहील, असंही सॅमसन म्हणाला. मी सध्या टी-२० वर लक्ष केंद्रीत करणार आहे. आता एकदिवसीय संघातील निवड ही माझ्या खेळावर आणि कामगिरीवर अवलंबून आहे. मला जेव्हा जेव्हा संधी मिळेल त्या-त्या वेळी झोकून देऊन स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करेन, असा विश्वासही त्यानं व्यक्त केला. वर्ल्डकप स्पर्धेत खेळून देशाला विजेतेपद मिळवून देण्याचं माझं स्वप्न आहे. हे स्वप्न कधी पूर्ण होईल ? कोणत्या वर्षी होईल, हे मला माहीत नाही. पण हेच माझं स्वप्न आहे, असंही तो म्हणाला.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2pgyWDc

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...