Ads

Wednesday, October 2, 2019

टीम इंडियाच्या तोफा धडाडल्या; रोहितनंतर मयांकचंही शतक

विशाखापट्टणम: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताच्या तोफा धडाडल्या आहेत. 'हिटमॅन' रोहित शर्मानंतर दुसरा सलामीवीर मयांक अग्रवाल यानंही खणखणीत शतक झळकावलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याचं हे पहिलंच शतक आहे. तर, काल शतक ठोकणाऱ्या रोहित शर्मानं दीडशे धावांचा टप्पा ओलांडला आहे. विशाखापट्टणम येथे कालपासून सुरू झालेल्या सामन्यात भारताच्या सलामीच्या जोडीनं तळ ठोकला आहे. रोहित शर्मानं काल कसोटी कारकिर्दीतलं चौथं शतक ठोकल्यानंतर आज मयांक अग्रवालनं त्यावर कळस चढवला. कालच्या ८४ धावांवरून पुढं खेळताना त्यानं शतकी टप्पा सहज पार केला. या दोघांच्या शतकी कामगिरीच्या जोरावर भारताची धावसंख्या ३०० च्या जवळ पोहोचली आहे. मयाकनं २०१८-१९ मध्ये बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेपासून कसोटी पदार्पण केलं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग अर्धशतकं ठोकून त्यानं आपलं स्थान पक्कं केलं. त्यानंतर वेस्ट इंडिज विरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेतही मयांकनं ५० हून अधिक धावा करत लक्ष वेधून घेतले. मात्र, अर्धशतकाचं शतकामध्ये रूपांतर करण्याच्या त्याच्या क्षमतेबद्दल क्रिकेटचे जाणकार शंका व्यक्त करत होते. या सर्व शंकाकुशंकांना मयांकनं आज आपल्या खेळीतून उत्तर दिलं. कसोटी शतक झळकावणारा तो ८६ वा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याचं हे शतक भारताचं ५१० वं कसोटी शतक ठरलं आहे. लोकेश राहुल व मुरली विजय हे दोघेही सलामीवीर म्हणून अपयशी ठरल्यानं मयांक अगरवालला संधी देण्यात आली होती. त्यानं हा विश्वास सार्थ ठरवला आहे. द. आफ्रिकेविरुद्ध भागीदारीचा विक्रम मयांकबरोबर रोहित शर्माला कसोटीतील सलामीवर म्हणून प्रथमच संधी देण्यात आली होती. त्यानं पहिल्याच सामन्यात २४४ चेंडूंत १७६ धावा कुटल्या. दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावांची भागीदारी करण्याचा मानही रोहित आणि मयांकला मिळाला आहे. या दोघांनी मिळून ३१७ धावा केल्या आहेत. यापूर्वी सर्वाधिक भागीदारीचा विक्रम गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग यांच्या नावावर होता. त्यांनी पहिल्या विकेटसाठी २१८ धावा केल्या होत्या. वाचा:


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2pu7Log

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...