विशाखापट्टणम: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेदरम्यान कसोटी मालिका सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला कर्णधार विराट कोहली जेव्हा पत्रकार परिषदेसाठी पोहोचला, तेव्हा त्याच्यासाठी एक सरप्राइझ वाट पाहत उभं होतं. विराट कोहलीचा एक जबरदस्त चाहता विराटची कधी पासून वाट पाहत उभा होता. विराट जेव्हा या चाहत्याला भेटला तेव्हा त्याला वाटले की, हा चाहता देखील इतर चाहत्यांसारखाच सेल्फी किंवा ऑटोग्राफ मागेल, मात्र तसे झाले नाही. त्या चाहत्याने विराटकडे आपले टी-शर्ट काढून टाकण्याची परवानगी मागितली. जेव्हा त्या चाहत्याने टी-शर्ट काढून टाकल्यानंतर विराट आश्चर्यचकितच झाला. त्याने आपल्या या विशेष चाहत्याला मिठीच मारली. विराटच्या या चाहत्याचे नाव असे असून आपण विराटचे सर्वात मोठे प्रशंसक असल्याचे तो मानतो. पिंटूने आपल्या संपूर्ण शरीरावर विराट कोहलीचे एकूण १५ कोरले आहेत.
पिंटू हा ओडिशा राज्यातील बरहामपूर येथील राहणारा आहे. त्याने पहिला टॅटू सन २०१६ मध्ये कोरला होते. तेव्हापासून आतापर्यंत त्याने आपल्या शरीरावर १५ टॅटू कोरले आहेत. त्याने पहिला टॅटू आपल्या छातीवर उजव्याबाजूला कोरला होता. पहिले टॅटू विराटच्या चेहऱ्याचे होते. हा पहिला टॅटू त्याने विश्वचषकादरम्यान बनवले होते. या १५ टॅटुंमध्ये विराटचा जर्सी नंबर, पाकिस्तानविरुद्ध अर्धशतक ठोकल्यानंतर सचिनने केलेला सन्मान, प्रशिक्षक राजकुमार शर्मा, अनुष्का शर्माला फ्लाइंग किस करताना विराट अशा टॅटुंचा समावेश आहे. या व्यतिरिक्त विराटला मिळालेला अर्जुन पुरस्कार, खेलरत्न याचेही टॅटू पिंटूच्या शरीरावर पाहायला मिळतात.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2p5TYUH
No comments:
Post a Comment