नवी दिल्ली: टीम इंडियाचा कर्णधार दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रांचीच्या जेएससीए स्टेडियम मैदानावर गंमती-जमती करताना दिसला. त्याने हात उंचावत हातांची बोटे पसरून डोळे वटारले. विशेष म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) विराटचा हा फोटो ट्विट करत या फोटोसाठी कॅप्शन देण्याचे आवाहन केले आहे. बीसीसीआयने ट्विट केलेला विराटचा हा फोटो पाहून असे वाटते की, विराट कुणाला तरी घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. बीसीसीआयने हा फोटो ट्विट केल्यानंतर त्यावर लोकांना कॅप्शन देण्याबाबत आवाहन केले आणि लोकांनी चित्रविचित्र कॅप्शन दिली. काही लोकांनी तर विराट कोहलीचा 'भूत' असाही उल्लेख केला. एका युजरने लिहिले, 'आबरा का डाबरा, विराट कोहली प्रोटियासवर जादू चालवत आहे. आणखी एकाने गली बॉय चित्रपटाचे पोस्टर शेअर करत लिहिले, 'भाग, भाग, भाग आया शेर आया शेर' अवनीश नावाच्या एका यूजरने लिहिले, 'पिचवर काळी जादू'. तर अनुराग सिन्हा नावाच्या एका युजरने लिहिले, ' विराटमॅन आपल्या कोळ्याच्या जाळ्यात दक्षिण आफ्रिकेला अडकवत असताना.' विराट कोहलीने या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात केवळ १२ धावाच करू शकला. त्याने मालिकेतील पुणे येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात नाबाद २५४ धावा ठोकत दमदार द्विशक साजरे केले होते. विशाखापट्टणममध्ये त्याने २० आणि ३१ धावांची खेळी केली होती.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/32ACXkr
No comments:
Post a Comment