मुंबई: टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने आज (बुधवार) अधिकृतपणे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. या बरोबरच सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली मंडळाचे कामकाज पाहणाऱ्या प्रशासकांच्या समितीचा (CoA) कार्यकाल देखील संपुष्टात आलेला आहे. या पुढे मंडळाशी संबंधित सर्व कामकाज बीसीसीआयचे निवडून आलेले प्रतिनिधीच पाहणार आहेत. सुप्रीम कोर्टाने निश्चित केलेल्या जबाबदारीबाबत आपण अतिशय समाधानी असल्याची प्रतिक्रिया बुधवारी बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित राहण्यासाठी आलेले सीओएचे अध्यक्ष विनोद राय यांनी या सभेत उपस्थित राहण्यापूर्वी म्हटले आहे. वाचा- बीसीसीआयच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्याबरोबर कामाला सुरुवात करावी असे निर्देश या पूर्वी सुप्रीम कोर्टात न्यायाधीश एस. ए. बोबडे आणि न्यायाधीश एल. नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने प्रशासकांच्या समितीला दिले होते. भारताचे माजी नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) विनोद पाय यांच्या नेतृत्वात ही प्रशासकीय समिती गेल्या ३३ महिन्यांपासून मंडळाचे कामकाज पाहत होती. वाचा- सन २०१३ मध्ये आयपीएल स्पर्धेदरम्यान स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीच्या आरोपांनंतर सुप्रीम कोर्टाला बीसीसीआयच्या कामकाजाची दखल घ्यावी लागली होती. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डाच्या कामकाजात पारदर्शकता यावी, भ्रष्टाचार संपावा, यासह अनेक सुधारणा करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने २२ जानेवारी २०१५ या दिवशी न्यायाधीश आर. एम. लोढा यांच्या नेतृत्वात एका समितीचे गठन केले होते. समितीने त्याच वर्षी १४ जुलै या दिवशी आपला अहवाल सादर केला होता. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्याच्या उद्देशाने प्रशासकीय समितीचे गठन केले होते. वाचा- गांगुलीला मिळणार १० महिन्यांचा कार्यकाळ गांगुलीला अवघ्या १० महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे. गांगुलीला प्रशासकीय कामकाजाचा उत्तम अनुभव आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनची धुराही त्यानं यशस्वीरित्या सांभाळली आहे. सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या प्रशासाकीय समितीमुळं क्रिकेटची घडी विस्कटल्याचा अनेकांचा आरोप आहे. ही घडी पुन्हा बसविण्यासाठी गांगुलीसारखा प्रशासक हवा, असं अनेकांचं मत होतं. त्यातूनच त्याचं नाव पुढं आल्याचं सूत्रांकडून समजतं.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2BwSCWd
No comments:
Post a Comment