रांची: दक्षिण आफ्रिकाविरुद्ध रांचीत सुरू असलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात भारतीय संघ भक्कम स्थितीत आहे. भारतानं ४९७ धावांवर पहिला डाव घोषित केल्यानंतर मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिका संघाचा अवघ्या १६२ धावांत खुर्दा केला. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीनं पाहुण्या संघाला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. कर्णधार म्हणून प्रतिस्पर्धी संघाला फॉलोऑन देण्याची त्याची ही आठवी वेळ आहे. त्यानं माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीनचा विक्रम मोडीत काढला. रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर भारतीय संघानं पहिल्या डावात ९ बाद ४९७ धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ मैदानात उतरला. भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना जेरीस आणलं. दक्षिण आफ्रिकेचा संघ १६२ धावांवर गारद झाला. भारताकडे पहिल्या डावात ३३५ धावांची आघाडी होती. कर्णधार विराट कोहलीनं पाहुण्या संघाला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. प्रतिस्पर्धी संघाला फॉलोऑन देण्याची ही त्याची आठवी वेळ आहे. यासह तो सर्वाधिक वेळा फॉलोऑन देणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. त्यानं माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीन याचा विक्रम मोडला आहे. त्यानं प्रतिस्पर्धी संघाला सात वेळा फॉलोऑन दिला होता. कर्णधार म्हणून विराट कोहलीचा हा ५१ वा कसोटी सामना आहे. तर अझहरुद्दीननं ४७ सामन्यांत भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं. महेंद्रसिंग धोनीनं ६० कसोटी सामन्यांत पाच वेळा, तर सौरव गांगुलीनं ४९ सामन्यांमध्ये चार वेळा प्रतिस्पर्धी संघांना फॉलोऑन दिला होता. भारताची दक्षिण आफ्रिकेवर आघाडी भारतानं पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेला १६२ धावांत गुंडाळून ३३५ धावांची आघाडी मिळवली. पहिल्या डावाचा विचार केला तर दक्षिण आफ्रिकेविरोधात भारतानं दुसऱ्यांदा मोठी आघाडी मिळवली आहे. याआधी २००९-१०मध्ये कोलकाता कसोटीत भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३४७ धावांची आघाडी मिळवली होती. उमेश यादव चमकला दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात भारताकडून जलदगती गोलंदाज उमेश यादव यशस्वी ठरला. त्यानं ४० धावा देत तीन फलंदाज तंबूत धाडले. पहिला कसोटी सामना खेळणारा फिरकीपटू शाहबाज नदीम आणि मोहम्मद शमीनं प्रत्येकी दोन फलंदाजांना बाद केलं.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2P6GK5g
No comments:
Post a Comment