रांची: तिसऱ्या व मालिकेतील शेवटच्या कसोटीवर टीम इंडियाने आपली मजबूत पकड बनवली आहे. कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा पहिला डाव अवघ्या १६२ धावांत गुंडाळला. पहिल्या डावात भारताने ३३५ धावांची आघाडी घेतली असून दक्षिण आफ्रिकेवर फॉलोऑन लादला आहे. दुसऱ्या दिवशी भारताने आपला पहिला डाव ९ बाद ४९७ धावांवर घोषित केला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने अवघ्या ९ धावांवर २ गडी गमावले होते. तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज भारतीय गोलंदाजीचा प्रतिकार करतील अशी अपेक्षा होती. मात्र, भारतीय गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही. चौथ्या विकेट्ससाठी हाम्झा आणि बावुमा यांनी ९१ धावांची भागिदारी रचत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, रविंद्र जाडेजाने हाम्झाला त्रिफळाचीत करत त्याची खेळी संपुष्टात आणली. हाम्झाने ६२ धावा केल्या. त्यापाठोपाठ पुढच्या षटकात नदीमने बावुमाला ३२ धावांवर यष्टिचीत केले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज मैदानावर टिकू शकले नाहीत. नवव्या विकेट्ससाठी जॉर्ज लिंडे (३७ धावा) आणि नॉर्तजे (४ धावा) ३२ धावांची भागिदारी रचली. भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. उमेश यादवने ४० धावांच्या मोबदल्यात सर्वाधिक तीन बळी मिळवले. तर मोहम्मद शमी, नदीम, जाडेजा यांना प्रत्येकी दोन बळी मिळवले. दरम्यान, तत्पूर्वी हित शर्माची द्विशतकी खेळी आणि अजिंक्य रहाणेच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतानं पहिल्या डावात ९ बाद ४९७ धावा केल्या. रोहित शर्मानं २१२ धावा केल्या. तर अजिंक्य रहाणे ११५ धावा केल्या. दुसऱ्या दुसरी डावाची सुरुवात करणाऱ्या रोहित आणि रहाणेनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. रोहित शर्मानं द्विशतक तडकावलं. तर उपकर्णधार अजिंक्य रहाणेनं कसोटी कारकिर्दीतील अकरावं शतक ठोकलं. हे दोघेही बाद झाल्यानंतर रवींद्र जडेजा वगळता कोणत्याही फलंदाजाला मैदानावर फार काळ तग धरता आला नाही. जडेजानं ५१ धावांची खेळी केली. तर वृद्धिमान साहा यानं २४ धावा केल्या. अश्विननं १४ धावा, उमेश यादवनं ३१ धावा केल्या. मोहम्मद शमी १० धावांवर नाबाद राहिला. दरम्यान, भारतानं ९ बाद ४९७ धावांवर डाव घोषित केला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2MzPxe0
No comments:
Post a Comment