मुंबई: वर्ल्डकप २०१९ मध्ये टीम इंडियाची कामगिरी जोमात आहे. स्पर्धेतले नऊपैकी सात सामने भारताने जिंकले आहेत. एक सामना पावसामुळे रद्द झाला. गुणतालिकेत भारत अव्वल स्थानी आहे. या वर्ल्डकपमधलं भारतीय संघाचं प्रमुख आकर्षण ठरलाय तो 'शतकवीर' . रोहितच्या या शानदार कामगिरीबद्दल कर्णधार विराट कोहलीने त्याची मुलाखत घेतली. शनिवारी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यादरम्यान विराटने रोहितलं बोलतं केलं. विराटने रोहिलतला विचारलं की सातत्यपूर्ण कामगिरी तू कशी करतोयस? रोहित त्यावर म्हणाला, 'ही एक खूपच महत्त्वाची स्पर्धा आहे आणि आपल्या टीमची फलंदाजांची फळी उत्तम आहे. सलामीचा फलंदाज म्हणून माझा नेहमी हाच प्रयत्न असतो की माझा फॉर्म कायम राहिल.' पहिल्याच सामन्यात शतक ठोकल्यानंतर आत्मविश्वास वाढल्याचंही रोहितने सांगितलं. शेवटी विराटने अपेक्षा व्यक्त केली की रोहित या स्पर्धेत आणखी दोन सामन्यांत अशीच शतकी फटकेबाजी करेल आणि भारताला चषक जिंकण्यात मदत करेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/30eW4iv
No comments:
Post a Comment