बर्मिंगहॅम: इंग्लंडच्या भूमीत सुरू असलेल्या वर्ल्डकप स्पर्धेत धावांचा पाऊस पाडणारा टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मावर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. आता टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीही त्याचा 'जबरा फॅन' झाला आहे. त्यानं रोहितचं भरभरून कौतुक केलं आहे. रोहित सर्वात चांगला एकदिवसीय खेळाडू आहे, असं तो म्हणाला. बांगलादेशविरुद्ध रोहित शर्मानं शतक ठोकलं. त्याच्यावर चाहत्यांसह विराट कोहलीही खूश आहे. रोहितच्या शतकी खेळीमुळं भारतानं बांगलादेशला नमवून वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. रोहितनं या स्पर्धेत चौथं शतक ठोकलं आहे. विजयानंतर विराटनं त्याचं कौतुक केलं. सर्वात चांगला एकदिवसीय खेळाडू असल्याचं मी नेहमीच म्हणतो, अशा शब्दांत विराटनं त्याला शाबासकी दिली. मी कधीच विक्रमांवर लक्ष देत नाही. चांगला खेळ करण्याचा नेहमी प्रयत्न करतो, असं रोहित यावेळी म्हणाला. विराटनं हार्दिक पंड्याचंही कौतुक केलं. हार्दिकनं दबावामध्ये चांगली गोलंदाजी केली. एकंदरीतच संघाच्या कामगिरीमुळं खूपच खूश आहे, असं तो म्हणाला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2XpufHi
No comments:
Post a Comment