लंडन : पाकिस्तान संघाला वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याचा मार्ग खडतर झाला असला तरी देखील पाकिस्ताने मात्र आशा सोडलेली नाही. वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी पाकिस्तानला बांगलादेश विरुद्ध सामन्यात प्रथम फलंदाजी घेऊन एका मोठ्या विजयाची गरज आहे. सामन्याची सुरुवात बांगलादेशच्या फलंदाजीने झाली, तर पाकिस्तान संघ वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर जाईल. 'आम्ही येथे प्रत्येक सामना जिंकण्यासाठी आलो आहोत. आम्ही हा शेवटचा सामना जिंकून या मोहीमेची समाप्ती करू', असा विश्वास पाकिस्तानचा कर्णधार याने व्यक्त केला आहे. तसेच, 'उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी आम्ही अतोनात प्रयत्न करू, तरी आम्हाला वास्तवाचे भान आहे. जर अल्लाहची इच्छा असेल, तर चमत्कार होऊ शकतो.'असंही सरफराज म्हणाला. 'आम्ही जर ६००, ५०० किंवा ४०० धावा केल्या. त्यानंतर खेळपट्टीवर विरोधकांना ५० धावात गुंडाळले, तर आपण ३१६ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकू शकतो. हे तुम्हाला शक्य वाटत असेल', तर आम्ही नक्की प्रयत्न करू, असं मत सरफराजने उपांत्य फेरीतील प्रवेशावर मत व्यक्त केले. या वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानने आतापर्यंत ३४८/८ या सर्वोच्च धावसंख्या केल्या आहेत. पाक संघाने ही धावसंख्या इंग्लंड संघाविरुद्ध केला होत्या. ही धावसंख्या करून पाकने इंग्लंडला पराजित केले होते. तर या वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडने अफगाणिस्तान विरुद्ध ३९७/६ या सर्वोच्च धावसंख्या केल्या होत्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2YyI2rr
No comments:
Post a Comment