हेडिंग्ले: सलामीवीर रोहित शर्मा आणि राहुलच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघानं श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवून सेमीफायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. या विजयानंतर कर्णधार खूप खूश आहे. या संघाचा कर्णधार असणं हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे, असं तो म्हणाला. श्रीलंकेनं पहिली फलंदाजी करताना ७ बाद २६४ धावा केल्या. हे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघानं ४४ व्या षटकातच ते पार केलं. सलामीवीर रोहितनं तडाखेबंद शतक केलं. के. एल. राहुलनंही १११ धावांची खेळी केली. जसप्रीत बुमराहनं ३ विकेट घेतल्या. या विजयानंतर विराट खूपच खूश आहे. 'चांगला खेळ करणं हेच आमचं ध्येय होतं. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर सेमीफायनलआधी अशा प्रकारची कामगिरी करू हे आमच्या ध्यानीमनीही नव्हतं. मात्र, कठोर मेहनतीमुळं हे शक्य झालंय. संघाचा अभिमान वाटतो. या संघाचा मी एक भाग आहे याचा अभिमान वाटतो. भारताचं प्रतिनिधित्व करणे हे गौरवास्पद आहे,' असं कोहली म्हणाला. प्रतिस्पर्धी संघ कोणताही असो, आम्ही त्याकडे लक्ष देत नाही. आम्ही जर चांगला खेळ केला नाही तर कोणताही संघ हरवू शकतो. पण चांगला खेळ केला तर कोणत्याही संघाला पराभूत करू शकतो. आता सेमीफायनलवर आमचं लक्ष आहे, असंही कोहलीनं आत्मविश्वासानं सांगितलं.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2XwQqGw
No comments:
Post a Comment