बर्मिंगहॅम: आयसीसी स्पर्धेत फॉर्मात असलेल्या टीम इंडियाला लागोपाठ तिसरा झटका बसला आहे. क्रिकेटपटू शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमारपाठोपाठ अष्टपैलू खेळाडू विजय शंकरलाही दुखापतीमुळे संघाबाहेर बाहेर पडावं लागलं आहे. त्याच्या जागी मयंक अग्रवालला संधी देण्यात आली आहे. या वर्ल्डकप स्पर्धेत विजय शंकरला फारशी चमकदार कामगिरी करता आली नव्हती. नेट प्रॅक्टिस करताना जसप्रीत बुमराहचा एक चेंडू त्याच्या गुडघ्याला लागल्याने जखमी झाला होता. त्यामुळे त्याला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातही खेळता आलं नव्हतं. त्याच्या जागी ऋषभ पंतला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात संधी देण्यात आली होती. आता पुढच्या सामन्यांसाठी विजय शंकरच्या जागी मयंक अग्रवालला संधी देण्यात आली आहे. विजयची दुखापत अधिक गंभीर नसली तरी त्याचे संघात पुनरागमन होईल की नाही यावर साशंकता व्यक्त केली जात आहे. यापूर्वी दुखापतीमुळे शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमारला संघाबाहेर जावं लागलं होतं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात नाथन कुल्टरचा एक उसळता चेंडू शिखर धवनच्या हातावर आदळला होता. त्यामुळं त्याच्या अंगठ्याला मार लागला होता. त्याची पर्वा न करता त्या सामन्यात शिखरनं धडाकेबाज शतक ठोकलं होतं. मात्र, क्षेत्ररक्षणासाठी तो मैदानात उतरू शकला नव्हता. त्याच्याऐवजी रवींद्र जाडेजानं क्षेत्ररक्षण केलं होतं. सामन्यानंतर केलेल्या वैद्यकीय तपासणीत त्याच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्याचं समोर आल्यानं त्याला तीन आठवड्यांची विश्रांती देण्यात आली होती.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2XbJ9f7
No comments:
Post a Comment