इंग्लंड: महेंद्रसिंह धोनीसारखा खेळाडू पुन्हा होणे नाही. धोनी भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एक दंतकथाच झाला आहे. त्याने अत्यंत कठीण परिस्थितीतून भारतासाठी विजय खेचून आणला असून येणाऱ्या कालखंडामध्ये त्याचे नाव पुन्हा पुन्हा गायले जाईल अशा शब्दांत विराटने महेंद्रसिंह धोनीवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. वर्ल्डकपमधील वेस्ट इंडिजविरोधातील सामन्यातील विजयाचा महेंद्रसिंह धोनी शिल्पकार असून या विजयामुळे आयसीसी वर्ल्ड रॅंकिंगमध्ये भारताने पहिला क्रमांक गाठला आहे. अफगाणिस्तान विरोधात फलंदाजांच्या ऑर्डरमध्ये बदल केल्याबद्दल महेंद्रसिंह धोनीवर टीकेची झोड उठवली जात होती. पण वेस्टइंडिज विरोधातील सामन्यामध्ये शेवटच्या षटकांत १६ धावा ठोकत २६८पर्यंत धावसंख्या नेऊन धोनीने तगडं आव्हान दिलं. भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यासमोर वेस्ट इंडिजचा एकही फलंदाज टिकू शकला नाही आणि १४३ धावांवर सगळा संघ तंबूत परतला. या सामन्यातील विजयानंतर विराट कोहलीने धोनीचं तोंडभरून कौतुक केलं. 'आम्ही जेव्हाही संकटात असतो तो तेव्हा धोनी मदतीला धावून येतो. सामन्याच्यामध्ये काय करायचं हे धोनीला चांगलंच माहित असतं. संघाची पडती बाजू कशी सावरायची हे धोनीला चांगलंच कळतं. ' असं विराटने सांगितलं. तसंच धोनीला जेव्हा सुट्टी असते तेव्हा तेव्हा धोनी सर्व खेळाडूंचे मार्गदर्शन करतो. त्यांच्यातील त्रुटी समजवून सांगतो असंही यावेळी विराटने नमूद केलं. तसंच धोनीच्या खेळाचा येत्या काळात जागतिक स्तरावर अभ्यास केला जाईल असंही त्याने यावेळी नमूद केलं. त्यासोबतच त्याच्याही कामगिरीवर समाधानी असल्याचं त्याने सांगितलं. भारतीय फलंदाज काही खास कामगिरी करत नसले तरी येत्या सामन्यांमध्ये भारताची खेळी निश्चित सुधारेल असा विश्वासही त्याने व्यक्त केला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/31ZxMuo
No comments:
Post a Comment