Ads

Monday, August 27, 2018

आर्मीत नोकरीसाठी सांगलीतील तरुणाचं टॉवरवर शोले स्टाईल आंदोलन

<strong>सांगली :</strong> आर्मीत भरती होण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर निराश  झालेल्या एका तरुणाने सांगली शहरातील एका टॉवरवर चढून शोले स्टाईलने आंदोलन केलं. नोकरीची लेखी हमी दिल्याशिवाय खाली उतरणार नाही, असा पवित्रा घेऊन तो तरुण सांगली शहरातील स्टेशन चौकातील बीएसएनएलच्या टॉवरवर चढला. यामुळे शहरातील सर्व यंत्रणांची चांगलीच पळापळ झाली. अनिल हणमंत कुंभार (वय 26 वर्ष) असं त्या तरुणाचं नाव असून तो वाळवा तालुक्यातील इटकरे गावचा आहे. सुमारे पाच तासाच्या आंदोलनांनंतर अधिकाऱ्यांनी त्याला लेखी पत्राचे आश्‍वासन दिलं. यानंतर तो युवक संध्याकाळी पाचच्या सुमारास टॉवरवरुन खाली उतरला. <a href="https://static.abplive.in/wp-content/uploads/sites/4/2018/08/28031753/Youth-Tower-Agitation.jpg"><img class="alignnone wp-image-579237 size-full" src="https://ift.tt/2Npc5fK" alt="" width="715" height="493" /></a> लष्करात असणाऱ्या कुंभारच्या वडिलांचे 2013 मध्ये निधन झालं. अनिलने आयटीआयचा वेल्डरचा कोर्स केल्यानंतर माजी सैनिकाचा मुलगा या अनुकंपा तत्वावर सैन्यदलात अनेकवेळा भरतीचा प्रयत्न केला. मात्र त्यात तो अगदी काही गुणांवर अपयशी ठरत होता. त्यामुळे तो निराश झाला होता. सांगलीतील सैनिक कल्याण केंद्रातही तो जाऊन आला होता. सोमवारी (27 ऑगस्ट) सकाळी तो सांगलीत आला होता. त्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास तो स्टेशन चौकातील बीएसएनएलच्या कार्यालयात असणार्‍या टॉवरवर सुरक्षा रक्षकाची नजर चुकवून चढला. तासभर झाला तरी त्याची कोणी दखल न घेतल्याने त्याने टॉवरचा एक नटबोल्ट आणि एक अँगल काढून खाली फेकला. तरीही त्याची कोणी दखल घेतली नाही. त्यानंतर त्याने मोबाईलवरुन शहर पोलिस ठाणे तसंच महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना फोन करुन आपण टॉवरवर चढल्याचं सांगितलं. <a href="https://static.abplive.in/wp-content/uploads/sites/4/2018/08/28031753/Youth-Tower-Agitation-2.jpg"><img class="alignnone wp-image-579239 size-full" src="https://ift.tt/2wlgSIv" alt="" width="599" height="412" /></a> त्याचा फोन आल्यानंतर पोलिस आणि अग्निशमन दलाची पळापळ झाली. त्याला लाऊडस्पीकरवरुन खाली उतरण्याची वारंवार विनंती करण्यात आली. पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. आर्मीत भरतीचं पत्र दिल्याशिवाय खाली उतरणार नाही, असा पवित्रा त्याने घेतला. त्याला पत्र देण्याचे आश्‍वासन देण्यात आल्यावर तो पाचच्या सुमारास खाली उतरला. त्यानंतर सर्व यंत्रणांनी सुटकेचा निश्‍वास सोडला.

from maharashtra https://ift.tt/2BOQEmM

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...