मेलबर्न : शेन वॉर्नच्या पत्नीचे नाव आहे. ती योग शिक्षिका (सर्टिफाइड योग टीचर) आहे. लग्नाच्या १० वर्षानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दोघे १९९२ मध्ये भेटले आणि नंतर १९९५ मध्ये त्यांनी लग्न केले. दोघांनी २००५ मध्ये परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. १९९२ मध्ये शेन वॉर्नची माजी पत्नी सिमोन ऑस्ट्रेलियन लेगर फॉस्टरसाठी प्रमोशन गर्ल म्हणून काम करत होती. त्यादरम्यान तिची शेन वॉर्नसोबत एका कार्यक्रमात भेट झाली. त्यावेळी ऑस्ट्रेलियासाठी पहिला कसोटी क्रिकेट सामना खेळणार होता. यानंतर दोघांची मैत्री झाली आणि नंतर ते एकमेकांना डेट करू लागले. शेन वॉर्न आणि सिमोन यांनी शेवटी १९९५ मध्ये लग्न केले आणि दोन वर्षांनी त्यांना पहिले अपत्य झाले. सध्या सिमोन ५२ वर्षांची असून ती ऑस्ट्रेलियात राहते. सोशल मीडियावर सक्रिय शेन वॉर्नची माजी पत्नी सिमोन कॅलाहन सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि ती नेहमीच तिचे योग करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अनेक लोक तिला इन्स्टाग्रामवर फॉलो करतात आणि तिच्याकडून योग शिकतात. मुलांमुळे राहिले एकमेकांच्या संपर्कात शेन वॉर्न आणि सिमोन कॅलाहन यांचा २००५ मध्ये घटस्फोट झाला, पण मुलांमुळे ते नेहमी संपर्कात राहिले. २००९ मध्ये दोघेही पुन्हा एकमेकांच्या जवळ आले, पण त्यांनी पुन्हा घटस्फोट घेतला. सिमोनने द सनला सांगितले की, 'शेन वॉर्नने तिची पुन्हा फसवणूक केली, म्हणून तिने नातेसंबंध पुढे वाढविले नाहीत.' शेन वॉर्न आणि सिमोन कॅलाहन यांना तीन मुले आहे. त्यांच्या मोठ्या मुलीचे नाव ब्रुक आहे, ती २४ वर्षांची आहे. तर दुसऱ्या मुलीचे नाव समर आहे, ती २० वर्षांची आहे. या दोघांना एक मुलगा आहे, जो २२ वर्षांचा आहे आणि त्याचे नाव जॅक्सन आहे. एलिझाबेथ हर्लेला करत होता डेट २०११ मध्ये, वॉर्न ब्रिटिश अभिनेत्री एलिझाबेथ लिझ हर्लेला डेट करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. २०११ मध्ये लिझच्या घटस्फोटानंतर दोघांनी लग्न केले, पण त्यानंतरही वॉर्नचे नाव लंडनची पॉर्न स्टार क्लो कॉरॅड हिच्याशी जोडले गेले. त्यामुळे तीन वर्षांच्या नात्यानंतर त्यांचे नाते संपुष्टात आले. १००० महिलांशी होते संबंध पत्रकार पॉल बॅरी यांनी २००६ मध्ये त्यांच्या 'स्पून आउट' या पुस्तकात लिहिले होते की, 'शेन वॉर्नने १००० महिलांसोबत सेक्स केला आहे, पण तो फक्त ५ वेळाच पकडला गेला. जगातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर क्रिकेट विश्वासह जगभरातील लोकांनाही मोठा धक्का बसला आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, तो त्याच्या व्हिलामध्ये बेशुद्धावस्थेत सापडला होता. त्याला रुग्णालयात नेले असता त्याच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आली. लेग स्पिनवर प्रभुत्व मिळवलेल्या शेन वॉर्नने लग्नाच्या १० वर्षानंतर पत्नीपासून घटस्फोट घेतला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/Wk17bVI
No comments:
Post a Comment