नवी दिल्ली : भारताविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत केन विल्यम्सन खेळला नव्हता, पण कसोटी मालिकेत मात्र तो न्यूझीलंडच्या संघाचे नेतृत्व करणार आहे. त्याचबरोबर केनला आता भारतामध्ये इतिहास रचण्याची एक सुवर्णसंधी चालून आलेली आहे. केन विल्यम्सनला इतिहास रचण्याची कोणती संधी आहे, पाहा...केन विल्यम्सन शांत असला तरी तो एक चाणाक्ष कर्णधार आहे आणि भारताविरुद्ध त्याचे नेतृत्व आतापर्यंत दमदार झालेले पाहायला मिळालेले आहे. भारताविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी विश्रांतीनंतर केन सज्ज झाला आहे. या कसोटी मालिकेत केनला एक विक्रम खुणावतो आहे. आतापर्यंत न्यूझीलंडचा संघ ११ वेळा भारताच्या दौऱ्यावर आला आहे. या ११ कसोटी मालिकांमध्ये भारताने ९ वेळी विजय मिळवला आहे, तर दोन मालिका अनिर्णीत राहीलेल्या आहेत. त्यामुळे न्यूझीलंडचा आतापर्यंत भारतामध्ये एकदाही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. त्याचबरोबर भारताच्या संघातील महत्वाच्या खेळाडूंनी या मालिकेमधून विश्रांती घेतली आहे. रोहित शर्मा आणि रिषभ पंत हे या मालिकेत खेळणार नाहीत, त्याचबरोबर लोकेश राहुलला गंभीर दुखापत झाली असून तो या मालिकेत खेळू शकणार नाहीत. त्याचबरोबर विराट कोहली हा पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार नाही. त्यामुळे या कसोटी मालिकेत भारताचे महत्वाचे खेळाडू खेळणार नाहीत आणि याचाच फायदा आता केन विल्यम्सन उचलू शकतो. त्यामुळे केनकडे भारताला त्यांच्याच मातीत पराभूत करण्याची ही नामी संधी आहे. आतापर्यंत न्यूझीलंडच्या एकाही कर्णधाराला भारताला त्यांच्या मातीत पराभूत करता आलेले नाही. पण सध्याच्या परिस्थितीचा विचार करता केनसाठी ही सुवर्णसंधी असल्याचे समजले जात आहे. केनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने भारताला विश्व अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभूत केले होते. त्यानंतर ट्वेन्टी-२० विश्वचषकातही न्यूझीलंडने भारतावर विजय मिळवला होता. २०१९ साली झालेल्या इंग्लंडमधील विश्वचषकातही न्यूझीलंडनेच भारताला उपांत्य फेरीत पराभूत केले होते. त्यामुळे आता कसोटी मालिकेत केनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडचा संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3CLJs5h
No comments:
Post a Comment