दुबई : स्कॉटलंडविरुद्धचा सामना हा भारतासाठी महत्वाचा असणार आहे. कारण या सामन्यात विजयासह भारतीय संघाला रनरेटही वाढवायचा आहे. त्यामुळे भारतीय संघात या सामन्यासाठी काही महत्वाचे बदल होऊ शकतात. भारतीय संघात कोणते बदल होऊ शकतात, पाहा...आतापर्यंतच्या तिन्ही सामन्यांमध्ये भारताने आपल्या संघात बदल केले आहेत. सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांना एका सामन्यासाठी संघाबाहेर ठेवण्यात आले होते. त्याचबरोबर दोन सामन्यांनंतर वरुण चक्रवर्तीलाही संघाबाहेर ठेवत आर. अश्विनला तिसऱ्या सामन्यात संधी दिली होती. पहिले दोन्ही सामने भारताने गमावले असले तरी तिसऱ्या सामन्यात मात्र भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. विजय मिळवल्यावर शक्यतो संघात बदल केले जात नाहीत. पण भारताच्या फलंदाजी क्रमाममध्ये मात्र नक्कीच बदल होऊ शकतो. पहिल्या सामन्यात रोहित शर्मा आणि लोकेश राहुल सलामीला आले होते. पण दुसऱ्या सामन्यात इशान किशनला सलामीला पाठवत रोहित शर्माला तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला पाठवले होते. या सामन्यात कोहली चौथ्या स्थानावर फलंदाजीला आला होता. मात्र तिसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजी क्रमामध्ये मोठा बदल पाहायला मिळाला. तिसऱ्या सामन्यात रोहित आणि राहुल सलामीला आले असले तरी कोहली तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला आला नव्हता. या सामन्यात कोहली फलंदाजीलाच आला नसल्याचे पाहायला मिळाले. कारण तिसऱ्या स्थानावर रिषभ पंतला बढती देण्यात आली होती, तर चौथ्या स्थानावर हार्दिक पंड्या खेळायला आला होता. चौथ्या सामन्यातही भारतीय संघात परिस्थितीनुसार बदल करण्यात येऊ शकतो. तिसऱ्या सामन्यात जलदगतीने धावा करायच्या होत्या, त्यामुळे रिषभ आणि हार्दिक यांना बढती दिली होती. आता स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात संघात कोणता बदल होईल, असे दिसत नसले तरी फलंदाजी क्रमवारीत नक्कीच बदल पाहायला मिळू शकतात. चौथ्या सामन्यात सूर्यकुमार यादवला बढती देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण या विश्वचषकात त्याला जास्त संधी मिळालेली नाही. त्यामुळे चौथ्या सामन्यासाठी सूर्यकुमार यादव हा तिसऱ्या किंवा चौथ्या स्थानावर फलंदाजीला येऊ शकतो. एकदंरीत या सामन्यात परिस्थिती नेमकी कशी आहे, त्यावर भारताच्या फलंदाजीचा क्रम अवलंबून असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3k7D3Lg
No comments:
Post a Comment