रांची : विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला खरा, पण त्याला आता या दोन्ही सामन्यांमध्ये जोरदार धक्के बसल्याचे समोर आले आहे. विराट कोहलीला दोन्ही सामन्यांमध्ये कोणते जोरदार धक्के बसले, पाहा...ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारताला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. विश्वचषकानंतर विराटने भारताच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे कर्णधारपद सोडले आणि त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत न खेळण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय कोहलीच्या चांगलाच अंगलट आल्याचे पाहायला मिळत आहे. कारण या दोन्ही सामन्यांमध्ये कोहलीला दोन मोठे धक्के बसले आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताचा सूर्यकुमार यादव तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला आला होता आणि त्याने धडाकेबाज फलंदाजी करत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. सूर्यकुमारच्या या खेळीनंतर यापुढे त्यालाच तिसऱ्या क्रमांकावर खेळायला पाठवायला हवे, ही मागणी जोर धरत आहे. त्यामुळे आता विराटचे भारतीय संघातील तिसरे स्थान धोक्यात आले आहे. त्यामुळे आता जर सूर्यकुमारला तिसऱ्या स्थानावर खेळवले तर विराटला चौथ्या स्थानावर खेळावे लागू शकते. हा कोहलीला बसलेला पहिला धक्का आहे. शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यातही कोहलीला एक धक्का बसला आहे. दुसऱ्या सामन्यात कोहलीचा ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम मोडीत निघाला आहे. दुसऱ्या सामन्यात मार्टीन गप्तिलने ३१ धावा केल्या आणि कोहलीचा विश्वविक्रम मोडीत काढला आहे. या सामन्यात गप्तिलने पहिल्या दोन चेंडूंवर दोन चौकार वसूल केले होते. पण पहिल्या षटकाच्या चौथ्याच चेंडूवर त्याला बाद करण्याची संधी लोकेश राहुलकडे होती. पण राहुलने यावेळी गप्तिलचा झेल सोडत त्याला जीवदान दिले आणि त्यानंतर धडाकेबाज फलंदाजी करत गप्तिलने कोहलीचा विश्वविक्रम मोडीत काढला आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये विराट कोहलीने ९५ सामन्यातील ८७ डावात ५२.०४च्या सरासरीने ३ हजार २२७ धावा केल्या आहेत. यात २९ अर्धशतकांचा समावेश आहे. या सामन्यापूर्वी गप्तिलने ११० सामन्यात ३२.४९च्या सरासरीने ३ हजार २१७ धावा केल्या आहेत. त्याने दोन शतक आणि १९ अर्धशतक झळकावली होती. दुसऱ्या सामन्यात ३१ धावा करत गप्तिलच्या नावावर आता ३ हजार ३ २४८ धावा झाल्या असून आता ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम आता गप्तिलच्या नावावर जमा झाला आहे. विराट आता दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघात येणार असून तोपर्यंत गप्तिलच्याच नावावर हा विश्वविक्रम राहणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3cwqi8U
No comments:
Post a Comment