रांची : धडाकेबाज फटकेबाजी करत रोहित शर्माने आजच्या सामन्यात इतिहास रचला आहे. रोहितने आजच्या सामन्यात अशी कामगिरी केली आहे की, जी आतापर्यंत एकाही भारतीय फलंदाजाला अजूनपर्यंत जमलेली नाही. रोहित शर्माने आजच्या सामन्यात कोणता इतिहास रचला आहे, पाहा...रोहितने दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात धमाकेदार फटकेबाजी केली. पहिल्या सामन्यात रोहितचे अर्धशतक दोन धावांनी हुकले होते. पण रोहितने आज आपले अर्धशतक पूर्ण केले. रोहितने यावेळी ५५ धावांची दमदार खेळी साकारली. ही खेळी साकारताना रोहितने यावेळी पाच चौकार लगावले आणि इतिहास रचला. रोहितने जेव्हा पहिलाच षटकार लगावला होता तेव्हा ४५० षटकारांचा टप्पा त्याने पूर्ण केला होता. त्यानंतर त्याने अजून चार षटकार लगावले आणि नेत्रदीपक फटकेबाजीचा नजराणा पेश केला. याआधी ४५० षटकारांचा टप्पा पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदी आणि वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल यांनी पार केला आहे. आजपर्यंत एकाही भारतीय खेळाडूंना ४५० षटकारांचा टप्पा पार केला नाही. त्यामुळे रोहितने एक षटकार मारताच तो अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला आहे. या सामन्यात रोहितने न्यूझीलंडविरुद्धच्या उर्रवरीत दोन टी-२० सामन्यात आठ षटकार मारले तर टी-२० मध्ये त्याचे १५० षटकार पूर्ण झाले आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर अशी अशी कामगिरी करणारा तो दुसरा फलंदाज ठरले. याआधी न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिल याने टी-२० मध्ये १५० षटकार मारण्याची कामगिरी केली आहे. रोहितने यावेळी भारताच्या डावाची दमदार सुरुवात केली. लोकेश राहुलचीही त्याला यावेळी चांगली साथ मिळाली. रोहित आणि राहुल यांनी धमाकेदार फटकेबाजीचा नुमना पेश केला. या दोघांनीही या सामन्यात अर्धशतक झळकावले आणि भारताचा विजय निश्चित केला. लोकेश राहुलने यावेळी ४९ चेंडूंत ४ चौकार आणि दोन षटकारांसह ६५ धावांची खेळी साकारली. रोहितने यावेळी ३६ चेंडूंत एक चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर ५५ धावांची धडेकाबीज खेळी केली. त्यामुळे आता रोहित आफ्रिदी आणि गेल यांचा विश्वविक्रम कधई मोडणार, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3x5Pson
No comments:
Post a Comment