Ads

Friday, October 1, 2021

KKR vs PBKS 45th Match IPL 2021: पंजाबचा कोलकातावर कडकडीत विजय, मुंबई इंडियन्सला मागे टाकले

दुबई: आयपीएलच्या १४व्या हंगामात शुक्रवारी झालेल्या लढतीत पंजाब किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचा ५ विकेटनी पराभव केला. या विजयासह त्यांनी गुणतक्त्यात मुंबई इंडियन्सला मागे टाकत पाचवे स्थान मिळवले. प्रथम फलंदाजी करत केकेआरने पंजाबला विजयासाठी १६६ धावांचे आव्हान दिले होते. वाचा- विजयासाठी १६६ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पंजाब किंग्जला कर्णधार केएल राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी शानदार सुरूवात करून दिली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी ७० धावा जोडल्या. मयांक २७ चेंडूत ४० धावा करून बाद झाला. त्यानंतर निकोलस पूरन ७ चेंडूत १२ धावांवर माघारी परतला. दरम्यान कर्णधार केएल राहुलने अर्धशतक पूर्ण केले. पुरनच्या जागी आलेला एडन मार्करम १८ धावांवर बाद झाला तर दिपक हुड्डा फक्त ३ धावा करू शकला. वाचा- य... अखेरच्या षटकात पंजाबला विजयासाठी ५ धावांची गरज होती. केकेआरकडून अय्यरने हे षटक टाकले. मैदानावर राहुल आणि शाहरुख खान होते. पहिल्या चेंडूवर शाहरूखने एक धाव काढली. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर राहूल एक मोठा शॉट खेळण्यास गेला आणि बाद झाला. त्यामुळे ४ चेंडूत ४ धावा असे समिकरण झाले. स्ट्राईकवर असलेल्या शाहरुख खानने षटकार मारून संघाला विजय मिळून दिला. वाचा- त्याआधी पंजाबने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सलामीवीर वेंकटेश अय्यरच्या ६७ धावांच्या जोरावर कोलकाताने २० षटाकत ७ बाद १६५ धावा केल्या. कोलकाताकडून राहुल त्रिपाठीने ३४ तर नितिश राणाने ३१ धावांचे योगदान दिले. केकेआरचा कर्णधार इयान मॉर्गन धावा करण्यात पुन्हा एकदा अपयशी ठरला. पंजाकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक ३ तर रवी बिश्नोईने २ विकेट घेतल्या. वाचा-


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3mgXGEX

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...