दुबई: आयसीसी टी-२० वर्ल्डकप सुरू होण्याआधी भारतीय संघाची ओळख सर्वात मजबूत टीम आणि विजेतेपदाचे दावेदार म्हणून केली जात होती. पण पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर आता टीम इंडिया स्पर्धेतून पहिल्या फेरीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. भारतीय संघाने एकही लढत गमावली तर ते स्पर्धेतून बाहेर पडतली. इतक नव्हे तर त्यांना न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील लढतीच्या निकालावर अवलंबून रहावे लागणार आहे. भारतीय संघाने गेल्या दोन सामन्यात कशी कामगिरी केली याचा अंदाज फक्त एका गोष्टीवरून लावता येईल. भारतीय गोलंदाजांनी गेल्या दोन सामन्यात मिळून फक्त दोन विकेट घेतल्या आहेत. भारताची फलंदाजी न्यूझीलंडविरुद्ध देखील अपयशी ठरली. गोलंदाजांना फक्त दोन विकेट घेता आल्या. वाचा- पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांना एकही विकेट घेता आली नाही. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी नाबाद लक्ष्य गाठले. भारताकडून त्या सामन्यात भुवनेश्वर, बुमराह, जडेजा आणि वरुण यांनी गोलंदाजी केली होती. पण १७.५ षटकात भारताला एकही विकेट मिळाली नाही. न्यूझीलंडविरुद्ध भारताला दोन विकेट मिळाल्या. पण या दोन्ही विकेट एकाच गोलंदाजाने म्हणजे जसप्रीत बुमराहने घेतल्या. शमी, शार्दुल, पंड्या, जडेजा आणि वरुण यांनी गोलंदाजी केली पण यश आले नाही. न्यूझीलंडने १४.३ षटकात विजय मिळवला. या कामगिरीवरून भारतीय संघाच्या अपयशाचे कारण स्पष्ट होते. टी-२० वर्ल्डकपच्या आधी वरुण चक्रवर्ती निवडीवर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. त्याने आयपीएलमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. पण वर्ल्डकपमधील दोन सामन्यात वरुण अपयशी ठरला. पाकिस्तानविरुद्ध त्याने ३३ धावा तर न्यूझीलंडविरुद्ध २३ धावा दिल्या. भारताचा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारला देखील पाकिस्तानविरुद्ध अपयशी ठरला. त्यामुळे त्याला दुसऱ्या सामन्यात संधी मिळाली नाही. भुवीच्या जागी संघात स्थान मिळालेल्या शार्दूलला एकही विकेट घेता आली नाही. शमी, जडेजा यांना देखील विकेट घेता आल्या नाहीत. आता विराट कोहली संघात कोणता बदल करतोय हे पाहावे लागले. उर्वरीत ३ सामन्यात आर अश्विन किंवा राहुल चाहर यांना संधी दिली जाऊ शकते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/31jzP0F
No comments:
Post a Comment