दुबई, : भारतीय संघाला न्यूझीलंडकडून लाजरवाणा पराभव पत्करावा लागला. पण या पराभवानंतरही भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकतो. त्यासाठीचे एक समीकरण आता आता समोर आला आहे. जाणून घ्या भारतीय संघाचे उपांत्य फेरीचे समीकरण...भारताला विश्वचषकात पहिल्यांदा पाकिस्तान आणि आता न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला आहे. भारताच्या आता लढती बाकी आहेत, त्यामध्ये टीम इंडिया आता अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाशी भिडणार आहे. या तिन्ही संघांबरोबर न्यूझीलंडचा संघही भिडणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांचे तीन सामने बाकी आहेत. नामिबिया आणि स्कॉटलंड हे क्रिकेट विश्वात तसे कच्चा लिंबू समजले जाणारे संघ आहेत. त्यामुळे हे दोन संघ भारत आणि न्यूझीलंडसारख्या दादा संघांना पराभूत करतील असे वाटत नाही. पण अफगाणिस्तानचा संघ हा कोणालाही धक्का देऊ शकतो. सध्याच्या घडीा अफगाणिस्तानचा संघ हा चांगल्या फॉर्मात आहे. त्यामुळे अफगाणिस्तानने जर न्यूझीलंडला पराभूत केले, तरच भारताला उपांत्य फेरीत पोहोचण्याची संधी असेल. पण दुसरीकडे भारताला अफगाणिस्तानवर विजय मिळवावा लागेल. जर असे घडले तरी उपांत्य फेरीचे गणित हे रन रेटवर येऊन ठेपणार आहे. त्यासाठी भारताला या तीन सामन्यांमध्ये फक्त विजय मिळवून चालणार नाही, तर मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर असे घडत गेले तर भारताचा अखेरचा सामना हा नामिबियाबरोबर आहे. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघ मोठा विजय मिळवू शकतो. पण त्यासाठी अफगाणिस्तानने न्यूझीलडला पराभूत करायला हवे आणि दुसरीकडे भारताने अफगाणिस्तानला पराभूत करायला हवे. त्यामुळे भारतासाठी आता अफगाणिस्तानचा संघ महत्वाचा ठरणार आहे. पाकिस्तानचा संघ जवळपास उपांत्य फेरीत पोहोचला आहे. कारण आता तीनपैकी दोन लढती त्यांनी जिंकल्या तरी त्यांच्यासाठी उपांत्य फेरीच दरवाजे खुले होऊ शकतात. दुसरीकडे अफगाणिस्तानचा संघ यावेळी सर्वांनाच जोरदार धक्का देऊ शकतो. कारण अफगाणिस्तानचा संघ सध्या चांगल्या फॉर्मात आहे. त्यामुळे त्यांनी जर भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही देशांना पराभूत केले तर त्यांनाही उपांत्य फेरीत पोहोचण्याची संधी आहे आणि हे विसरून चालणार नाही.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3kdqC0D
No comments:
Post a Comment