शारजाह: आयपीएलच्या १४व्या हंगामातील दुसऱ्या सत्रात आज शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि यांच्यात लढत सुरू आहे. या लढतीत पंजाबनेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि केकेआरने ७ बाद १६७ धावा केल्या. सामना सुरू होण्याआधी पंजाब किंग्जला एक मोठा धक्का बसला. संघातील स्फोटक फलंदाजाने बायो बबल सोडण्याचा निर्णय घेतला. वाचा- नाणेफेक झाल्यानंतर पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुलने संघात ३ बदल करण्यात आल्याचे सांगितले. यातील एक बदल हा ख्रिस गेलच्या रुपातील होता. ख्रिस गेलला संघाबाहेर ठेवण्याचे कारण ना दुखापत होते ना त्याची कामगिरी. राहुलने सांगितले की गेल बायो बबलच्या बाहेर गेला आहे. त्यामुळे त्याच्या जागी फॅबियन अॅलन याला स्थान देण्यात आले आहे. वाचा- सामना सुरू होण्याच्या काही तास आधी ख्रिस गेलेने आयपीएलमधील उर्वरीत लढतीतून माघार घेण्याचे ठरवले. त्याने बाबो बबलमुळे थकवा आल्याचे कारण दिले. आयपीएलच्या आधी गेल सीपीएलमध्ये खेळत होता. ते जून महिन्यापासून बायो बबलमध्ये आहे. आधी वेस्ट इंडिजमध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानविरुद्धच्या मालिकांसाठी तो बायो बबलमध्ये होता. त्यानंतर सीपीएल आणि तेथून पुन्हा आयपीएलमध्ये भाग घेण्यासाठी तो युएईमध्ये आला. आयपीएलनंतर टी-२० वर्ल्डकप खेळायचा आहे. वाचा- मी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने बायो बबलमध्ये आहे. टी-२० वर्ल्डकपच्या आधी स्वत:ला फ्रेश करायचे आहे. जेणेकरून वर्ल्डकपवर फोकस करता येईल. मला वेळ देण्यासाठी पंजाब किंग्जला धन्यवाद. माझी इच्छा आहे की मी नेहमी संघासोबत असावे. पुढील लढतीसाठी संघाला शुभेच्छा. वाचा- गेलने या वर्षी ३७ टी-२० सामने खेळले आहेत. या काळात तो चार संघाकडून खेळला आहे. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात त्याने २ सामने खेळले आहेत. गेलच्या आधी बेन स्ट्रोक्सने मानसिक आरोग्याचे कारण देत माघार घेतली होती. बायो बबलमुळेच कायरन पोलार्ड, आंद्रे रसेल, डेव्हिड वॉर्नर यांनी इंग्लंडमधील द हंड्रेड मधून माघार घेतली होती.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3usGpwk
No comments:
Post a Comment