हेडिंग्ले : फॉर्मात असेलल्या आर. अश्विनला संघाबाहेर करण्याचा धक्कादायक निर्णय इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात घेण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्या कसोटीसाठीही अश्विनला संघाबाहेर ठेवले. पण आता तिसऱ्या कसोटीत तरी अन्याय झालेल्या अश्विनला संधी मिळू शकते, असे चित्र निर्माण झाले आहे. कारण एक महत्वाची गोष्ट आज घडली असून त्यानुसार अश्विनला तिसऱ्या सामन्यात संधी मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी एक महत्वाची गोष्ट आज घडल्याचे पाहायला मिळाले. कारण भारताचा कर्णधार विराट कोहली जेव्हा खेळपट्टी पाहण्यासाठी गेला तेव्हा त्याला धक्काच बसला. कारण या खेळपट्टीवर गवत ठेवण्यात आलेले नाही. त्यामुळे या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना जास्त मदत मिळणार नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे भारतीय संघ तिसऱ्या सामन्यात चार वेगवान गोलंदाज खेळवेल, असे दिसत नाही. त्यामुळे या सामन्यात तीन वेगवान आणि दोन फिरकी गोलंदाजांसह भारतीय संघ उतरू शकतो. त्यामुळे या सामन्यात अश्विनची खेळण्याची शक्यता वाढेलली आहे. त्याचबरोबर दुसरीकडे रवींद्र जडेजा अजूनपर्यंत पूर्णपणे फिट असल्याचे दिसत नाही. त्यामुळे जर तिसऱ्या कसोटी सामन्यात जर जडेजा खेळणार नसेल तर अश्विन हा भारतीय संघापुढे सर्वात चांगला पर्याय असू शकतो. त्यामुळे या तिसऱ्या कसोटीत अश्विन खेळण्याची दाट संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे अश्विन आता उद्याच्या सामन्यात खेळणार की नाही, याची उत्सुकता सर्वांनाच असेल. खेळपट्टी पाहिल्यावर विराट कोहली नेमकं काय म्हणाला, जाणून घ्या...जेव्हा खेळपट्टी पाहण्यासाठी कोहली मैदानात गेला तेव्हा त्याला धक्का बसला. याबाबत कोहली म्हणाला की, " तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी खेळपट्टी पाहायला मी मैदानात गेलो आणि मला धक्काच बसला. कारण या सामन्यासाठी खेळपट्टीवर गवत ठेवण्यात येईल, असे मला वाटले होते. पण खेळपट्टीवर मला गवत दिसले नाही." त्यामुळे खेळपट्टीवर गवत नसेल तर वेगवान गोलंदाजांना जास्त मदत मिळणार नाही. तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी विजयी संघात बदल करण्यात येणार नाही, असे कोहली म्हणाला असला तरी त्यांना आता खेळपट्टीनुसारच आपला संघ निवडावा लागणार आहे. अश्विनला हा कोणत्याही खेळपट्टीवर विकेट मिळवू शकतो आणि तो उपयुक्त फलंदाजीही करू शकतो.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/38axy8k
No comments:
Post a Comment