हेडिंग्ले : तिसऱ्या सामन्यात भारतीय संघ पराभूत झाला आणि त्यानंतर रवींद्र जडेजा हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे भारतीय संघाची चिंता वाढल्याचे पाहायला मिळत आहे. तिसरा कसोटी सामना संपल्यावर जडेजा लगेगच हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात जडेजा धडाकेबाज फलंदाजी करत होता, पण सामना संपल्यावर तो थेट हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. यावेळी जडेजाची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. तिसरा सामना सुरु असताना जडेजाच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघ क्षेत्ररक्षण करत होता आणि याचवेळी जडेजाला दुखापत झाली. ही दुखापत गंभीर असल्याने त्याने काही काळ विश्रांतीही घेतली होती. पण आता या दुखापतीचे स्वरुप नेमके आहे तरी काय, हे पाहण्यासाठी जडेजा हॉस्पिटलमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे आता जडेजाचा वैद्यकीय अहवाल आल्यावरच त्याच्या दुखापतीबाबतचे अपटेड्स मिळू शकतात. पण याबाबत बीसीसीआयने मात्र अधिकृतरीत्या कोणतीही माहिती दिलेली नाही. पण सामना संपल्यावर जडेजाने सोशल मीडियावर आपला हॉस्पिटलमधला फोटो पोस्ट केला आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वीही जडेजा फिट नसल्याचे म्हटले जात होते, पण तिसऱ्या सामन्यात मात्र जडेजा खेळला होता. तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात जडेजाला चार धावा करता आल्या होत्या, दुसऱ्या डावात त्याने ३० धावांची खेळी साकारली होती. यासामन्यात जडेजाला दोन विकेटच मिळवता आल्या होत्या. तिन्ही कसोटी सामन्यांमध्ये अष्टपैलू रवींद्र जडेजाला संधी देण्यात आली होती. पण तिन्ही सामन्यांमध्ये जडेजाला चांगली कामगिरी करता आली नाही. जडेजाला विकेट्स मिळवण्यातही अपयश आले आणि त्याला जास्त धावाही करता आल्या नाहीत. त्यामुळे चौथ्या कसोटी सामन्यासाठी जडेजाला संघाबाहेर काढण्याच येऊ शकते. जडेजाच्या जागी आर. अश्विन हा भारतीय संघासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. पण चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी जडेजाचा वैद्यकीय अहवाल येणार आहे. त्यामध्ये नेमकं काय समोर येतं, हे पाहणं सर्वात महत्वाचं असेल. त्यानंतरच चौथ्या कसोटीबाबतचा निर्णय घेण्यात येऊ शकतो.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3sSJp4l
No comments:
Post a Comment