हेडिंग्ले : तिसऱ्या कसोटी सामन्याला आता काही तासांमध्येच सुरुवात होणार आहे. पण तिसऱ्या कसोटी सामन्याची खेळपट्टी जेव्हा भारताचा कर्णधार विराट कोहलीने पाहिली तेव्हा त्याला मोठा धक्का बसला. त्याचबरोबर या खेळपट्टीबाबतचे विराटने आपले मत व्यक्त केले आहे. तिसरा कसोटी सामना बुधवारपासून हेडिंग्लेच्या मैदानात सुरु होणार आहे. या सामन्यासाठी खेळपट्टी कशी असेल, याचे चित्र कोहलीने आपल्या मानत तयार केले होते. त्यामुळे जेव्हा खेळपट्टी पाहण्यासाठी कोहली मैदानात गेला तेव्हा त्याला धक्का बसला. याबाबत कोहली म्हणाला की, " तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी खेळपट्टी पाहायला मी मैदानात गेलो आणि मला धक्काच बसला. कारण या सामन्यासाठी खेळपट्टीवर गवत ठेवण्यात येईल, असे मला वाटले होते. पण खेळपट्टीवर मला गवत दिसले नाही. त्यामुळे आता कोणत्या खेळाडूंना या सामन्यासाठी संधी द्यायची, याचा निर्णय आम्ही बुधवारीच घेणार आहोत." आतापर्यंंत दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये खेळप्टटीवर गवत होते आणि पण आता तिसऱ्या कसोटीसाठी मात्र खेळपट्टीवर गवत ठेवण्यात आलेले नाही.त्यामुळे कोहलीने जेव्हा खेळपट्टी पाहिली तेव्हा कोहलीला धक्का बसला. त्यामुळे आता कदाचित भारतीय संघातील एक वेगवान गोलंदाज संघाबाहेर जाण्याची शक्यता आहे. कारण या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना जास्त मदत मिळणार नाही. त्यामुळे भारतीय संघा या सामन्यासाठी तीन वेगवान आणि दोन फिरकी गोलंदाजांसह उतरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे उद्या सामन्याच्यापूर्वी जेव्हा संघ जाहीर करण्यात येईल, तेव्हा कोणत्या खेळाडूंना संघी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. भारताने ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर झालेल्या दुसऱ्या कसोटीत विजय मिळून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या विजयामुळे भारताचा आत्मविश्वास उंचावला आहे. मालिकेतील पहिल्या दोन्ही कसोटी भारताची कामगिरी शानदार झाली. पण मधळ्या फळीतील कामगिरी चिंताजनक आहे. मधळ्या फळीत पुजाराच्या जागी सूर्यकुमार यादवला संधी दिली जाऊ शकते. त्याच बरोबर आर अश्विनला संघाबाहेर ठेवल्यामुळे टीका झाली होती. अशात विकेट घेण्यास अपयशी ठरलेल्या रविंद्र जडेजाच्या जागी आर अश्विनला संधी दिली जाऊ शकते. त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात हे दोन मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2WjnCqs
No comments:
Post a Comment