हेडिंग्ले : तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरु होण्याच्या काही तासांपूर्वीच इंग्लंडच्या संघाने एक मोठी चाल खेळली आहे. ही चाल खेळत इंग्लंडचा संघ भारताला कोंडीत पकडू शकते. इंग्लंडने सामना सुरु होण्याच्या काही तासांपूर्वी केलेल्या या गोष्टीमुळे विराट कोहलीलाही धक्का बसला आहे. विराट कोहली आज जेव्हा मैदानात उतरला तेव्हा खेळपट्टी पाहून त्याला धक्का बसला. कारण इंग्लंडमध्ये खेळपट्टीवर नेहमीच गवत ठेवण्यात येते, कारण वेगवान गोलंदाजांना त्याचा फायदा मिळत असतो. पण आज मात्र कोहलीने जेव्हा खेळपट्टी पाहिली तेव्हा खेळपट्टीवर गवत नव्हते आणि त्यामुळे कोहलीला धक्का बसला. आता इंग्लंडची यामध्ये एक मोठी चाल आहे. सध्याच्या घडीला भारतीय संघ वरचढ ठरत आहे आणि इंग्लंडची फलंदाजी ही चांगली होताना दिसत नाही. इंग्लंडचा कर्णधार जो रुटला वगळले तर एकाही फलंदाजाला आतापर्यंत चांगली खेळी साकारता आलेली नाही. त्यामुळे इंग्लंडला यावेळी भारतीय संघाची विजयाची लय बिघडवायची आहे. कारण भारताचे वेगवान गोलंदाज चांगल्या फॉर्मात आहेत आणि खेळपट्टीवरून गवत काढले तर त्यांना या गोष्टीचा फायदा मिळणार नाही. त्याचबरोबर इंग्लंडच्या फलंदाजांना यावेळी फॉर्मात येण्यासाठी खेळपट्टीचा चांगला फायदा होऊ शकतो. कारण ही खेळपट्टी फलंदाजांना पोषक ठरू शकते. त्यामुळे दोन्ही संघांना आपल्या पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारता येऊ शकते. दोन्ही संघांनी पहिल्या डावात खेळताना ३ किंवा ४ दिवस घेतले तर सामना अनिर्णीत होऊ शकतो आणि भारताची विजयाची लय बिघडू शकते. त्यामुळे इंग्लंडने पूर्ण विचारानिशी खेळपट्टीवर गवत ठेवलेले नाही. त्यामुळे नाणेफेक जिंकल्यावर कोणताही संघ प्रथम फलंदाजी करायला प्राधान्य देईल आणि मोठी धावसंख्या उभारेल. या गोष्टीचा फायदा इंग्लंडच्या संघाला चांगलाच होऊ शकतो. त्यामुळे तिसरी कसोटी अनिर्णीत राखून चौथ्या कसोटीत विजयाचे स्वप्न आता इंग्लंडचा संघ पाहत आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात धावांचे डोंगर उभारले गेले तर सामना कोणीही जिंकू शकणार नाही आणि भारताची विजयाची लय तुटू शकते. त्यामुळे इंग्लंडच्या खेळपट्टीमध्ये मोठा बदल केल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता तिसऱ्या कसोटीचा निकाल काय लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3sWc8W5
No comments:
Post a Comment