कोलकाताः भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक निवडीसंदर्भात मत मांडण्याचा कर्णधार याला पूर्ण अधिकार आहे, असे प्रतिपादन माजी क्रिकेटपटू याने केले आहे. विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीत भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर वेस्ट इंडीज दौऱ्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार विराट कोहलीने रवी शास्त्री यांनीच मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत राहावे, असे मत व्यक्त केले होते. दरम्यान, रवी शास्त्री यांचा कार्यकाल वेस्ट इंडीज दौऱ्यानंतर समाप्त होत आहे. याबद्दल बोलताना सौरभ गांगुली म्हणाला की, विराट कोहली भारतीय संघाचा कर्णधार आहे. संघाचा प्रशिक्षक कोण असावा, याबद्दल मत व्यक्त करण्याचा त्याला पूर्ण अधिकार आहे. सौरभ गांगुली, सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण सदस्य असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीने २०१७ मध्ये रवी शास्त्री यांची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड केली होती. यावेळी क्रिकेट सल्लागार समितीमध्ये , आणि शांता रंगास्वामी सदस्य असून, ते नव्या प्रशिक्षकाची निवड करणार आहेत. कोहलीच्या मताचा परिणाम मुलाखतींवर नाहीः अंशुमन गायकवाड कर्णधार विराट कोहलीचे मत काही असले, तरी क्रिकेट सल्लागार समिती नवीन प्रशिक्षक निवडीसंदर्भात नियोजित प्रक्रियेनुसारच काम होईल, असे मत क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य अंशुमन गायकवाड यांनी व्यक्त केले आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2ZlEcSN
No comments:
Post a Comment