मुंबई भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी माजी क्रिकेटपटू यांनी अर्ज दाखल केला आहे. राजपूत यांनी मंगळवारी रितसर आपला अर्ज दाखल केला असून त्यांनी याआधी अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वे या दोन संघाचे प्रशिक्षकपद भूषवले आहे. वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाला फायनलमध्ये धडक मारण्यात अपयश आले. न्यूझीलंड संघाकडून भारतीय संघाचा पराभव झाला. त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) नव्या प्रशिक्षकाचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. त्यासाठी जाहिरात देऊन अर्ज मागवण्यात आले आहेत. बीसीसीआयने वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कोचिंग स्टाफचा कार्यकाळ वाढवला आहे. भारतीय संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू रॉबिन सिंह यांनी मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज दाखल केला आहे तर प्रवीण आमरे यांनी फलंदाजीच्या प्रशिक्षक पदासाठी अर्ज दाखल केला आहे. भारतीय संघ विंडीज दौऱ्यावर जात असून विंडीज दौऱ्यापर्यंत रवी शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य कोचिंग स्टाफचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे. या वर्षीच्या मे महिन्यापासून राजपूत हे झिम्बाब्वे क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. परंतु, क्रिकेटमध्ये राजकारणाचा शिरकाव वाढल्याने आयसीसीने झिम्बाब्वे क्रिकेट संघाला निलंबित केले आहे. राजपूत सध्या कॅनडामध्ये सुरू असलेल्या ग्लोबल टी-२० लीगमध्ये विनिपेग हॉक्स संघाचे कोच म्हणून काम पाहत आहेत. दरम्यान, टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केल्याची माहिती राजपूत यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना दिली आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Mu49fI
No comments:
Post a Comment