मुंबई: कानपूर कसोटी ड्रॉ झाल्यानंतर आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरी आणि अंतिम कसोटी उद्या म्हणजे शुक्रवारपासून मुंबईतील वानखेडे मैदानावर सुरू होणार आहे. मुंबईतील सामन्यात विजय मिळून मालिका जिंकण्याचा प्रयत्न दोन्ही संघ करतील. वानखेडेवर भारत आण न्यूझीलंड संघातील खेळाडूंना मोठे विक्रम करण्याची संधी आहे. जाणून घेऊयात अशा विक्रमांबद्दल... वाचा- न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताचा फिरकीपटू याने ६ विकेट घेतल्या होत्या. यासह त्याने वासीम अक्रम (४१४) आणि हरभजन सिंग (४१७) यांचा विक्रम मागे टाकला होता. अश्विनच्या नावावर आता ४१९ विकेट झाल्या आहेत. मुंबईत होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत त्याने ३ विकेट घेतल्यास कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा तो जगातील १२वा खेळाडू ठरले. याच बरोबर दक्षिण आफ्रिकेचा माजी जलद गोलंदाज शॉन पोलॉक (४२१) याला मागे टाकेल. वाचा- जर अश्विनने दुसऱ्या कसोटीत ८ विकेट घेतल्या तर भारत आणि न्यूझीलंड कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम त्याच्या नावावर होईल. दोन्ही संघात आतापर्यंत झालेल्या कसोटीत सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम न्यूझीलंडच्या रिचर्ड हेडली यांच्या नावावर आहे. त्यांनी ६५ विकेट घेतल्या आहेत. अश्विनने आतापर्यंत ५८ घेतल्या आहेत. ८ विकेट घेताच अश्विन आणखी एक विक्रम करू शकतो. वानखेडे मैदानावर सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर आहे. त्याने या मैदानावर ३८ विकेट घेतल्या आहेत. वाचा- अश्विन सोबत भारताचा कर्णधार विराट कोहली याला या सामन्यात विक्रम करण्याची संधी आहे. विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७० शतक केली आहेत. मुंबईत शतक झळकावल्या सर्वाधिक शतकांच्या बाबत तो रिकी पॉटिंगशी बरोबरी करेल. तर उपकर्णधार अजिंक्य रहाणे याला माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा विक्रम मागे टाकण्याची संधी आहे. धोनीने ९० कसोटीत ४ हजार ८७६ धावा केल्या आहेत. रहाणेने ७९ सामन्यात ४ हजार ७९५ धावा केल्यात. मुंबईत अजिंक्यने ८१ धावा केल्यास तो धोनीला मागे टाकेल आणि भारताकडून कसोटीत वेगाने धावा करणारा १३वा खेळाडू ठरले. वाचा- भारतीय खेळाडूंसह न्यूझीलंडचा गोलंदाज टीम साऊदी या सामन्यात विक्रम करू शकतो. त्याने भारताविरुद्ध १० सामन्यात ५२ विकेट घेतल्या आहेत. मुंबईत त्याने ६ विकेट घेतल्यास तो दोन्ही देशात सर्वाधिक विकेट घेणारा तिसरा गोलंदाज ठरले. या कामगिरीसह तो इरापल्ली प्रसन्ना आणि बिशन सिंह बेदी यांना मागे टाकेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3EoGGVa
No comments:
Post a Comment