![](https://maharashtratimes.com/photo/88064094/photo-88064094.jpg)
मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरी आणि अंतिम कसोटी मुंबईत आजपासून सुरू होणार आहे. मुंबईत दोन दिवस झालेल्या पावसामुळे मैदान ओले आहे त्यामुळे नाणेफेक होण्यास उशीर होत आहे. सकाळी साडे दहा वाजता पुन्हा एकदा मैदानाची पाहणी करून मग नाणेफेक होणार आहे. दरम्यान बीसीसीआयने एक मोठी अपडेट दिली आहे. वाचा- गेल्या काही दिवसांपासून धाव करण्यात अपयशी ठरलेला भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार मुंबईतील कसोटी खेळू शकणार नाही. स्वत: बीसीसीआयने सोशल मीडियावरून हे अपडेट दिले आहेत. अजिंक्य रहाणेसोबत इशांत शर्मा आणि ऑलराउंडर रविंद्र जडेजा हे दोन खेळाडू देखील दुसऱ्या कसोटीत खेळणार नसल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे. अजिंक्यसह इशांत आणि जडेजा दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीत खेळू शकणार नाहीत. वाचा- दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असेल याची चर्चा सुरू असताना संघाला ३ खेळाडूंच्या दुखापतीमुळे मोठा धक्का बसला आहे. जलद गोलंदाजी इशांत शर्मा हा दुखापतीमुळे पहिल्या कसोटीच्या पाचव्या दिवशी मैदानावर उतरू शकला नव्हता. वाचा- रविंद्र जडेजाला देखील पहिल्या कसोटीत दुखापत झाली आहे. जडेजाच्या उडव्या हाताच्या कोपराला दुखापत झाल्याचे बीसीसीआयने सांगितले. यामुळे त्याला दुसऱ्या कसोटीत विश्रांती देण्यात आली आहे. तर उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या डाव्या हॅमस्ट्रिंगला किरकोळ दुखापत झाली होती. रहाणेला ही दुखापत पहिल्या कसोटीत दरम्यान झाली होती. पण अद्याप त्यातून पूर्णपणे बाहेर आलेला नाही. त्यामुळे मुंबई कसोटीत खेळू शकणार नाही, असे बीसीसीआयने सांगितले. पहिल्या कसोटीत दुखापत झालेला आणखी एक खेळडू वृद्धिमान साहा फिट झाला असून तो झाला आहे. भारतीय संघात आता दुखापतीमुळे बाहेर झालेल्या ३ खेळाडूंच्या जागी कोणाला संधी मिळते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/31tpDT9
No comments:
Post a Comment