नवी दिल्ली : भारताने ट्वेन्टी-२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळू नये, ही मागणी आता जोर धरू लागली आहे. पण भारतीय संघाने जर पाकिस्तानविरुद्धचा सामना न खेळायचे ठरवले, तर त्यांचं नेमकं काय नुकसान होऊ शकतं, याचे सर्व पर्याय आता समोर आले आहेत. पहिला पर्याय भारताने जर पाकिस्तानविरुद्धचा सामना न खेळण्याचे ठरवले किंवा माघार घेतली तर भारताचे स्पर्धेत मोठे नुकसान होऊ शकते. पहिली गोष्ट म्हणजे पाकिस्तानला वॉकओव्हर दिला जाईल, याचाच अर्थ पाकिस्तानला हा सामना न खेळता दोन फुकटचे गुण मिळतील. त्याचबरोबर भारतीय संघाला एकही गुण मिळणार नाही. त्यामुळे भारताचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे संपूर्ण स्पर्धेचा विचार केला आणि भारताला जर बाद फेरीत पोहोचायचे असेल तर त्यांच्यासाठी प्रत्येक गुण महत्वाचा असेल. त्यामुळे असे दोन फुकट गुण पाकिस्तानला देऊन भारताला चालणार नाही. दुसरा पर्याय आयसीसीच्या स्पर्धेतील कोणत्याही देशाने आपला सामना रद्द करण्याचे ठरवले तर त्यांच्यावर मोठी कारवाई केली जाऊ शकते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष असेल. त्याचबरोबर स्पर्धेतील सर्वात जास्त प्रेक्षकवर्ग आणि पैसा कमावून देणारा हा सर्वात मोठा सामना आहे. त्यामुळे आयसीसी हा सामना भारताला रद्द करू देणार नाही. कारण आयसीसीच्या स्पर्धेत कोणताही देश प्रतिस्पर्धी संघाविरुद्धचा सामान रद्द करू शकत नाही. पण जर असे झाले तर या सामन्यातून मिळणारा सर्व नफा बीसीसीआयला आयसीसीला द्यावा लागेल. त्यामुळे बीसीसीआयचे आर्थिक नुकसान होऊ शकते. तिसरा पर्याय भारतीय संघ जर पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळला नाही तर त्यांना पळकुटे म्हटले जाऊ शकते. कारण भारताने यापूर्वीच जर पाकिस्तानविरुद्ध न खेळण्याचा निर्णय घेतला असता तर कदाचित याबाबत विचार केला गेला असता. पण आता सामना तोंडावर आला असताना भारताने जर हा सामना खेळण्यास नकार दिला तर त्यांची छबी क्रिकेट वर्तुळात वाईट होऊ शकते. या गोष्टीचा परीणाम बीसीसीआयवर सर्वात जाास्त होऊ शकतो.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3lUckmQ
No comments:
Post a Comment