दुबई: भारतीय संघाच्या टी-२० वर्ल्डकपमधील मोहिमेला फक्त काही तासांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. भारताची पहिली लढत कट्टर आणि पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सलग सहावा विजय मिळून षटकार मारण्याच्या इराद्याने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरले. विराट सोबत यावेळी मैदानात उपकर्णधार रोहित शर्मा आणि मैदाना बाहेर भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्र सिंह धोनी देखील असेल. धोनीमुळे भारताची रणनिती आणखी मजबूत होणार आहे. वाचा- आयसीसीच्या वर्ल्डकप स्पर्धेत भारताचे पाकिस्तानविरुद्धचे रेकॉर्ड बिनतोड आहे. दोन्ही देशात वनडे आणि टी-२० वर्ल्डकपमध्ये झालेल्या एकाही लढतीत भारताचा पराभव झालेला नाही. या दोन्ही संघात १९९२ साली सर्वप्रथम वर्ल्डकपमध्ये लढत झाली होती. त्या वर्षी भलेही पाकिस्तानने वर्ल्डकप जिंकला असला तरी भारताविरुद्ध त्यांना विजय मिळवता आला नव्हता. २००७ पासून सुरू झालेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये देखील भारताने आतापर्यंत झालेल्या पाचही लढतीत विजय मिळवला आहे. दोन्ही देशात द्विपक्षीय क्रिकेट होत नसल्याने चाहत्यांना आयसीसीच्या स्पर्धांची वाट पाहावी लागते. या सामन्याचा प्रेक्षक फक्त भारत आणि पाकिस्तानमध्ये नाही तर जगभरात असतो. यामुळेच प्रसारकांची देखील मागणी या दोन्ही देशांच्या लढती अधिक व्हाव्यात अशीच असते. आयसीसीने देखील या वर्षी या दोन्ही संघांना एकाच गटात टाकले आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकपेक्षा जास्त लढती होण्याची शक्यता आहे. वाचा- भारत आणि पाकिस्तानची लढत होणार हे जाहीर झाल्यापासून सोशल मीडियावर चाहत्यांनी त्याची तयारी सुरू केली आहे. आता ही लढत जस जशी जवळ येत आहे तस तशी उत्सुकता आणखी वाढत चालली आहे. जाणून घेऊयात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढती बाबतचे सर्व अपडेट.... वाचा- ICC टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅच कधी होणार आहे? >> ICC टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅच रविवारी २४ ऑक्टोबर २०२१ रोजी होणार आहे. ICC टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅच कुठे होणार आहे? >> ICC टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅच युएईमधील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. ICC टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅचचा टॉस किती वाजता होईल? >> ICC टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅचचा टॉस संध्याकाळी ७ वाजता होईल. ICC टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅच किती वाजता सुरू होईल? >> ICC टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅच भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल. ICC टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅचचे लाइव्ह टेलिकास्ट कुठे पाहू शकता? >>ICC टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅचचे लाइव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर आणि महाराष्ट्र टाइम्सच्या वेबसाइटवर पाहू शकता. ICC टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅचचे लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहू शकता? >> ICC टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅचचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. भारताचा संभाव्य संघ: रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, इशान किशन, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3jtLlN1
No comments:
Post a Comment