Ads

Friday, October 15, 2021

धोनी शब्द खरा करून दाखवला; आठवतय का काय म्हणाला होता

दुबई: आयपीएलमधील दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी संघ असलेल्या चेन्नई सुपर किंग्जसाठी २०२०चा हंगाम एखाद्या वाईट स्वप्नासारखा होता. आयपीएलच्या १३व्या हंगामात स्पर्धेतून बाहेर पडणारा चेन्नई हा पहिला संघ होता. स्पर्धा पार पडल्यावर सीएसके सातव्या क्रमांकावर होता. आयपीएलच्या इतिहासात असे प्रथमच झाले की चेन्नई संघाने भाग घेतला आणि त्यांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केला नाही. चेन्नई संघाची २०२० मधील कामगिरी ही चाहत्यांसाठी नव्हे तर प्रतिस्पर्धी संघांसाठी देखील धक्का देणारी होती. अनेकांनी धोनी आणि संपूर्ण संघावर टीका देखील केली होती. धोनीने निवृत्ती घ्यावी, डॅडी आर्मीने आता मोठे बदल केले पाहिजेत असे सल्ले देखील मिळाले होते. पण धोनीने तेव्हा देखील एकच गोष्ट सांगितली होती ती म्हणजे गोष्टी साध्या ठेवा आणि प्रोसेसला फॉलो करा. चेन्नईच्या आयपीएलमधील या सर्वात वाईट कामगिरीनंतर कर्णधार धोनीला जेव्हा विचारण्यात आले की आता पुढे काय? तेव्हा त्याने दिलेले उत्तर आजच्या आयपीएल विजयाने पूर्ण झाले. धोनी म्हणाला होता, आम्ही जोरदार कमबॅक करू, ज्यासाठी आम्ही ओळखले जातो. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने आज केकेआरचा २७ धावांनी पराभव करून चौथे विजेतेपद मिळवले. चेन्नई सुपर किंग्जने याआधी २०१०, २०११ आणि २०१८ साली विजेतेपद मिळवले होते. आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्सने सर्वाधिक विजेतेपद मिळवली आहे. मुंबईच्या नावावर ५ विजेतेपद आहेत. आता चेन्नई चार विजेतेपदासह मुंबईच्या जवळ पोहोचली आहे. चेन्नईने १४ पैकी १२ हंगामात भाग घेतला आहे. या १२ हंगामात त्यांनी ९ वेळा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आयपीएलमध्ये चेन्नई फक्त एकदा प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकले नाहीत. २०२० मधील हा अपवाद वगळता या संघाची कामगिरी सातत्यापूर्ण झाली आहे. आयपीएलमधील चेन्नईची कामगिरी २००८- दुसरे स्थान २००९- चौथे स्थान २०१०- विजेतेपद २०११- विजेतेपद २०१२- दुसरे स्थान २०१३- दुसरे स्थान २०१४- तिसरे स्थान २०१५- दुसरे स्थान २०१६- निलंबित २०१७- निलंबित २०१८- विजेतेपद २०१९- दुसरे स्थान २०२०- सातवे स्थान २०२१- विजेतेपद


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3lKB2pp

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...