Ads

Sunday, October 17, 2021

भारताला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या युवराजला अटक; पाहा कोणची चूक केली होती

हांसी: भारताला २०११ साली आयसीसी वर्ल्डकप जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडलेल्या क्रिकेटपटू युवराज सिंगला अटक करण्यात आली आहे. हरियाणातील हिसार येथे युवराजला अटक करण्यात आली. अटकेनंतर त्याला जामीन मिळाला आहे. जातिवाचक वक्तव्य केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. वाचा- रजत कलसन यांनी हांसी शहर पोलिस ठाण्यात एससी एसटी कायद्या अंतर्गत युवराज सिंगविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर उच्च न्यायालयाने युवीला जामीन मंजूर केला. वाचा- .. युवराज सिंगवर २०२० साली दलित समाजाविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप होता. या प्रकरणी रजत कलसन यांनी केलेल्या तक्रारीनंतर त्याच्यावर FIR दाखल करण्यात आला होता. युवराज सिंगने एका लाइव्ह चॅटमध्ये भारताचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलविरुद्ध जातीवाचक शब्दाचा वापर केला होता. त्या घटनेनंतर सोशल मीडियावर युवराज सिंगविरुद्ध मोहिम सुरू झाली होती. त्याने माफी मागावी अशी मागणी अनेक जण करत होते. तेव्हा #युवराज_सिंह_माफी_मांगो हा हॅशटॅग काही दिवस टॉपवर होता. अनेकांचा विरोध असल्याने अखेर युवराजने सोशल मीडियावरून माफी मागितली. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण रोहित शर्मा (Rohit Sharma) सोबतच्या इस्टाग्राम लाइव्ह चॅटमध्ये एक जातीवाचक शब्द वापरला होता. त्यानंतर दोघांच्या चॅटमधील क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. रोहित शर्मा आणि यांनी अनेक मुद्दयावर लाइव्ह चॅट केले होते. दोघांनी क्रिकेटच्या मैदानावरील आणि बाहेर अनेक गोष्टी एकमेकांसोबत आणि चाहत्यांसोबत शेअर केल्या. यातच भारतीय संघातील गोलंदाज कुलदीप यादव आणि युजवेंद्र सिंह यांच्याबद्दल कमेंट केली. रोहितसोबत बोलताना युवराजने या दोन क्रिकेटपटूंबद्दल जातीवाचक शब्द वापरले. हा शब्द वाल्मिकी समाजाबद्दल होता. आता यावरून सोशल मीडीयावर युवराजने माफी मागावी अशी मागणी केली जात होती. चॅटमध्ये युवराज आणि रोहित दोघे फिरकीपटू चहलच्या टिकटॉक व्हिडिओवर बोलत होते.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3pfCmmn

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...