दुबई: आयपीएलच्या १३व्या हंगामाला सुरूवात होण्यााठी ३६ तासांचा कालावधी शिल्लक राहिला नसताना एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे जे खेळाडू आयपीएलमध्ये खेळणार आहेत. त्यांचा क्वारंटाइनचा कालावधी ६ दिवसांच्या ऐवजी फक्त ३६ तासांचा करण्यात आला आहे. हे सर्व खेळाडू इंग्लंडमधून थेट युएईला येणार आहेत. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू वनडे मालिका संपवून युएईला दाखल झाले आहेत. या सर्वांच्या क्वांरटाइनचा कालावधी कमी करण्याची विनंती बीसीसीआयने केली होती. यावर युएईच्या संबंधित विभागाने परवानगी दिली आहे. वाचा- आयपीएलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे सर्व खेळाडू ६ दिवसांच्या ऐवजी आता फक्त ३६ तास क्वारंटाइन असतील. या संदर्भातील जी अडचण होती ती आता दूर झाली आहे. आता जवळपास सर्व खेळाडू संघांना पहिल्या सामन्यापासून उपलब्ध होतील. डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, जोफ्रा आर्चर आणि जोस बटलर आदी खेळाडू गुरुवारी रात्री युएईमध्ये दाखल झाले. त्यांची आरटी-पीसीआर चाचणी देखील घेण्यात आली आहे. वाचा- विमानात बसण्याआधी आणि विमानातून उतरण्याआधी त्यांची चाचणी घेण्यात आली आहे. त्यांनी कठोर नियमांचे पालन केले आहे. एका जैव सुरक्षित वातावरणातून दुसऱ्या जैव सुरक्षित वातावरणात त्यांनी प्रवेश केल्याने त्यांचा क्वारंटाइन कालावधी कमी करावा अशी मागणी बीसीसीआयने केली होती. वाचा- या निर्णयाने आणि आयपीएलमधील संघ आनंदी झाले आहेत. या निर्णयामुळे चेन्नईसाठी जोश हेजलबुड, टॉम कुर्रेन, राजस्थानसाठी स्मिथ, बटलर आणि आर्चर हे पहिल्या सामन्यापासून उपलब्ध असतील. अशाच पद्धतीने पंजाब आणि दिल्ली संघाचे खेळाडू देखील पहिल्या सामन्यापासून उपलब्ध राहतील. वाचा- आठ संघापैकी फक्त कोलकाता नाइट रायडर्स असा संघ आहे ज्यांना सहा दिवसाच्या क्वारंटाइन कालावधीचा काही परिणाम होणार नव्हता. त्यांचा पहिला सामना २३ तारखेला होणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/32DSdj1
No comments:
Post a Comment