मुंबई: बहुप्रतिक्षित () चा १३वा हंगाम उद्यापासून सुरू होत आहे. स्पर्धेतील पहिला सामना () विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. गतविजेते आणि सर्वाधिक फॅन फॉलोअर्स असलेल्या मुंबईच्या संघाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. तर धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर मैदानावर खेळताना दिसणार आहे. त्यामुळे पहिल्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष असेल. मुंबईच्या संघाकडून यावर्षी एक मोठे सरप्राइझ आहे. या संघाकडून असा एक क्रिकेटपटू खेळणार आहे. ज्याने क्रिकेटमध्ये पदार्पण चित्रपटातून केले आहे. वाचा- क्रिकेटपटूचे पदार्पण एखाद्या संघाकडून खेळून केली जाते आणि मग त्याची ओळख निर्माण होते. पण मुंबई इंडियन्स संघातील या खेळाडूचे क्रिकेटमधील पदार्पण अथवा ओळख निर्माण झाली ती एका बॉलिवडू चित्रटानने. दिग्विजयने सुशांत सिंह रजपूत (Sushant Singh Rajput) च्या २०१३ साली प्रदर्शित झालेल्या 'काय पो छे' () चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात अलीची भूमिका दिग्विजयने केली होती. चित्रपटात सुशांतने त्याला क्रिकेटचे प्रशिक्षण दिल्याचे दाखवले होते. वाचा- दिग्विजय एक जलद गोलंदाज आहे आणि महाराष्ट्राकडून खेळतो. आयपीएल २०२० च्या लिलावात मुंबई इंडियन्स संघाने २० लाख रुपयांची बोली लावून दिग्विजयला () करारबद्ध केले होते. दिग्विजय देशमुखने २०१९च्या रणजी ट्रॉपी स्पर्धेतून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तर १२ नोव्हेंबर २०१९ मध्ये मुश्ताक अली ट्रॉफीतून टी-२० पदार्पण केले. दिग्विजयने आतापर्यंत ७ टी-२० सामन्यातून १९ धावा आणि ९ विकेट घेतल्या आहेत. तर एका प्रथम श्रेणी सामन्यात ८५ धावा आणि सहा विकेट घेतल्या आहेत. डिसेंबरमध्ये त्याने रणजी सामन्यात पदार्पण केले होते. पहिल्या सामन्यात त्याने ७१ चेंडूत ८३ धावा केल्या होत्या. वाचा- वाचा- दिग्विजयला या गोष्टीचे दु:ख सुशांतच्या निधनावर दिग्विजय म्हणाला, सुशांतच्या निधनाचे फार दु:ख वाटते. ही खंत नेहमी वाटत राहिली की माझी आणि त्यांची भेट झाली नाही. आयपीएलमध्ये मुंबई संघात माझी निवड झाल्यानंतर विचार केला होता की स्पर्धा सुरू झाल्यानंतर मी सुशांत भाईला भेटेन आणि क्रिकेटपटू झाल्याची बातमी सांगेन. 'काय पो छे' चित्रपटाच्या वेळी सुशांत भाईने मला विचारले होते की, तु मोठा झाल्यावर कोण होणार आहेस. यावर मी क्रिकेटपटू होणार असल्याचे उत्तर दिले होते. मी त्यावेळी त्यांना सांगितले होते की, जेव्हा क्रिकेटपटू होईन तेव्हा तुम्हाला नक्की भेटेन. पण मी आता त्यांना कधीच भेटू शकणार नाही. याचे दु:ख नेहमीच राहील.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3hHzW8T
No comments:
Post a Comment