नवी दिल्ली: करोना व्हायरसमुळे या वर्षी आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना क्वारंटाइनचे नियम पाळावे लागत आहेत. या नियमामुळे इंग्लंडचा स्फोटक फलंदाज पहिल्या सामन्याला मुकला होता. आता उद्या रविवारी होणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी बटलर उपलब्ध होणार आहे. यामुळे राजस्थानची ताकद आणखी वाढणार आहे. वाचा- संघाने चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या पहिल्या सामन्यात २१६ धावा उभ्या केल्या होत्या. संजू सॅमसन, कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि जोफ्रा आर्चर यांनी तुफानी फलंदाजी केली होती. आता पंजाबविरुद्ध बटलर देखील असल्यामुळे राजस्थानची ताकद नक्कीच वाढणार आहे. वाचा- मी आयपीएलमधील पहिला सामना खेळण्यासाठी उत्सुक आहे. संघासोबतचा सराव चांगला झाला. सर्वांसोबत एक सकारात्मक ऊर्जा असल्याचे, बटलरने सामन्याआधी सांगितले. वाचा- पंजाबने गेल्या सामन्यात शानदार फलंदाजी केली होती. कर्णधार केएल राहुलने नाबाद १३२ धावा केल्या होत्या. त्यामुळे राजस्थान संघासाठी राहुल हा धोकादायक ठरू शकतो. राहुलची विकेट ही महत्त्वाची ठरणार आहे. हे मैदान छोटे असल्यामुळ मोठी धावसंख्या उभी करता येऊ शकते, असे बटलर म्हणाला. बटलरने आयपीएलमध्ये ४५ सामने खेळले आहेत. त्यात १ हजार ३८९ धावा केल्या असून ९ अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद ९५ ही त्याची सर्वोच्च खेळी आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2HAJYw5
No comments:
Post a Comment