Ads

Monday, August 3, 2020

धोनी म्हणाला, हा खेळाडू संघातील वातावरण खराब करेल

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार () लवकरच मैदानावर दिसणार आहे. धोनी युएईमध्ये होणाऱ्या (IPL) च्या १३व्या हंगामात खेळताना दिसेल. धोनी गेल्या एक वर्षापासून क्रिकेट खेळला नाही. त्यामुळे त्याच्या कमबॅकची सर्वांना प्रतिक्षा आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळा (BCCI) चे माजी अध्यक्ष (N. Srinivasan) यांनी धोनीबद्दलचा एक किस्सा सांगितला. धोनीने एकदा एका चांगल्या खेळाडूला () संघात घेण्यास नकार दिला होता. याबद्दल धोनी म्हणाला होता की, संबंधित खेळाडू संघातील वातावरण खराब करेल. वाचा- श्रीनिवासन इंडिया सिमेंट (India Cements)चे मालक आहेत आणि हीच कंपनी आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जची मालक आहे. धोनीबद्दलचा हा प्रसंग सांगताना त्यांनी संबंधित खेळाडूचे नाव नाही सांगितले. वाचा- एका वेबीनारमध्ये श्रीनिवासन म्हणाले, आम्ही धोनीला एका खेळाडूचे नाव सुचवले. त्यावर तो म्हणाला, नाही सर हा संघ खराब करेल. संघाची एकी फार महत्त्वाची आहे. तुम्ही अमेरिकेकडे पाहा तेथे फ्रेंचाइजी आधारावर खेळ मोठ्या काळापासून सुरू आहे. भारतात आता कुठे आपण सुरूवात केली आहे. आता आपल्यासाठी ही गोष्टी नवी आहे. पण इंडिया सीमेंटमध्ये जुनिअर स्तरावर संघ चालवण्याचा मोठा अनुभव आहे. वाचा- चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलचे तीन विजेपद मिळवली आहेत. मुंबई इंडियनपेक्षा सीएसकेचे विजेपद एकने कमी आहे. चेन्नईने आयपीएलच्या १० सत्रात भाग घेतला आणि किमान नॉकआउटपर्यंत पोहोचले. श्रीनिवासन म्हणाले, आम्ही डेटाला महत्त्व खुप महत्त्व देतो. आयपीएलमध्ये प्रत्येक टी-२० सामन्याआधी गोलंदाजीचे कोच विरोधी संघातील प्रत्येक फलंदाजाचा व्हिडिओ पाहतात. ते कसे बाद झाले आणि त्याची ताकद काय तसेच त्याची कमकूवत बाजू काय. पण धोनी अशा सत्रात कधीच भाग घेत नाही.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3k1R3Vj

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...